Waheeda Rehman
Waheeda Rehman Dainik Gomantak
मनोरंजन

Waheeda Rehman : वहिदा रहमान यांनी अमिताभ बच्चन यांच्या लगावली होती कानशिलात, नक्की काय घडलं होतं..

गोमन्तक डिजिटल टीम

'चौदवी का चाँद' हे गाणे ऐकले की आपल्या डोळ्यासमोर येतो वहीदा रहमान यांचा देखणा चेहरा आणि बोलके डोळे. कुठल्याच प्रकारे कोणतेही अभिनयाचे शिक्षण न घेता चित्रपटसृष्टीत त्यांनी आपले अढळ असे स्थान निर्माण केले आहे. 3 फेब्रवारी 1936 रोजी त्यांचा जन्म झाला. वहीदा रहमान आज त्यांचा 82 वा वाढदिवस साजरा करत आहे.

त्यावेळी असे म्हटले जायचे की, वहिदा इतक्या देखण्या होत्या की चित्रपटाच्या शूटवेळी त्यांचे सौंदर्य पाहून त्यांच्या सोबत काम करणारे अभिनेते बऱ्याचदा डायलॉग्जही विसरुन जात. वहिदा रहमान यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत आई आणि प्रेमिका या दोन्ही भूमिका केल्या आहेत. 'अदालत' (1976) चित्रपटात प्रेमिका आणि 'त्रिशूल' (1978) चित्रपटात त्यांच्या आईची भूमिका केली आहे.

असाच अजून किस्सा सांगितलं जातो तो म्हणजे वहिदा रहमान यांनी अमिताभ बच्चन यांच्या कानशिलात लगावली होती. हा 1971 मधील किस्सा आहे. 'रेश्मा और शेरा' या चित्रपटासाठी सुनील दत्त, वहिदा रहमान आणि अमिताभ बच्चन एकत्र काम करणार होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वहिदा रहमान यांनी अमिताभ बच्चन यांचा कानाखाली मारली. यानंतर सेटवर एकच शांतता पसरली होती.

खरं तर झालं होतं असं की, या चित्रपटाच्या एका सीनमध्ये अभिनेत्रीला अमिताभ बच्चन यांच्या गालावर थप्पड मारायची होती. वहिदा यांनी बच्चन यांना तसा इशारा दिला होता. अमिताभ यांना जरा भीतीच वाटतं होती. पण त्या असं काही करणार नाही असा विश्वासही त्यांना होता. पण सरतेशेवटी सीनची तयारी झाली आणि वहिदा यांनी अमिताभ यांना मारलं. त्यांनी ती थप्पड एवढ्या जोरदार मारली की त्याचा आवाज अख्खा सेटवर आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT