Vivek Oberoi Dainik Gomantak
मनोरंजन

Vivek Oberoi: 'ती एक पिशाच आहे, जी रक्त पिते' असं विवेक शिल्पाबद्दल का म्हणाला?

Vivek Oberoi: तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काय करत आहात याने काही फरक पडत नाही.

दैनिक गोमन्तक

Vivek Oberoi: बॉलीवूडचे कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील ते चर्चांचे कारण बनतात. आता विवेक ओबरॉय त्याने शिल्पा शेट्टीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.

विवेकने शिल्पा शेट्टी ही रक्त पिणारी बाई आहे असे म्हटले आहे. मात्र त्याने असे का म्हटले आहे हे सविस्तर जाणून घेऊयात. एका मुलाखतीदरम्यान विवेक म्हणाला की - 'मी जेव्हापासून शिल्पाला भेटलो आहे, तेव्हापासून तिच्यामध्ये चूकून काही बदल झाले आहेत. तिची शरीरयष्टी, तंदुरुस्ती, लूक, उंची, केस, सर्व काही अगदी सारखेच आहे. तिचं वयही वाढत नाही. ती एक पिशाच आहे, जी रक्त पिते.' असं तो गंमतीने म्हणताना दिसतो.

खरे तर शिल्पा आणि विवेक गेल्या २० वर्षापासून एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. विवेक पुढे म्हणाला, 'ती खूप छान आहे. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काय करत आहात याने काही फरक पडत नाही. आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा तितक्याच प्रेमाने आणि आदराने भेटतो. कधीच अनोळखी वाटत नाही. विवेक पुढे म्हणतो- ज्या लोकांसोबत माझ्या कुटुंबाने वेळ घालवावा असे मला वाटते ते असे लोक आहेत की मी त्यांच्याशी जोडला जातो. आज आमच्याकडे सर्वकाही असूनही आपली मध्यमवर्गीय मूल्ये अबाधित आहेत. आणि हेच आपल्याला सुरक्षित ठेवते. पुढे जगण्यास मदत होते.

नुकतीच विवेक आणि शिल्पाने रोहित शेट्टीच्या इंडियन पोलिस फोर्स या वेब सिरिजमध्ये एकत्र काम केले आहे. विवेक आणि शिल्पाने बॅचमेटची भूमिकाही साकारली आहे. मात्र नंतर ते नोकरीच्या ठिकाणामुळे वेगळे होतात. पण ते मिशनवर भेटतात. या वेब सीरीजमध्ये या दोघांशिवाय सिद्धार्थ मल्होत्रादेखील मुख्यभूमिकेत पाहायला मिळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

Goa News Live: अन्वर शेख हत्या प्रकरण; सर्व संशयितांची निर्दोष सुटका

Cooch Behar Trophy: गोव्याचा युवा संघ सुस्तावला, कुचबिहार क्रिकेट सामन्यात चंडीगड आघाडीच्या दिशेने

SCROLL FOR NEXT