आजकाल एखादं मत मांडुन ते मांडणारा बऱ्याचदा अडचणीत सापडू शकतो. सोशल मिडीया हे सर्वांसाठीच खुले असल्यामुळे एखाद्या वाक्यावर एखादा सेलिब्रिटी किंवा राजकारणी ट्रोल होऊ शकतो.
'द काश्मिर फाईल्स' चे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांच्याबाबतीत हेच झालं आहे. दीपिकाचं सुरूवातीला कौतुक करुन ट्रोल झाल्यावर त्यांनी आता त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.मग त्यात स्वरा भास्कर असो किंवा कंगणा राणौत त्याचप्रमाणे काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांचाही या यादीत सामावेश होतो.
नुकतच विवेक अग्नीहोत्री यांनी दीपिका पदुकोण हिचं ट्विट करत कौतुक केलं. त्यावरुन त्यांना इतकं ट्रोल केलं गेल की आता त्यांनी यावर स्पष्टीकरण देत त्यांचा मुद्दा मांडला आहे. त्याच झालं असं की, दीपिका पदुकोण ऑस्कर 2023 मध्ये प्रस्तुतकर्ता म्हणून सहभागी होणार आहे.
यामुळे बॉलिवूडशी संबंधितच नव्हे तर सर्वच स्तरावरील लोकांनी दीपिकाचं कौतुक केले आणि तिला शुभेच्छा दिल्या.
दीपिकाचं अभिनंदन करणाऱ्यांमध्ये द काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचाही सामावेश होता. जगभरातील बड्या स्टार्ससोबत दीपिका पदुकोणचेही नाव होते. यावर विवेक अग्निहोत्री म्हणाले होते की, हे भारतीय चित्रपटांचे वर्ष आहे.
अनुपम खेर यांनीही दीपिका पदुकोणचे जोरदार कौतुक केले होते.विवेक अग्निहोत्री यामुळे ट्रोल झाल्यानंतर आता त्यांनी पुन्हा ट्विट केलं आहे.
विवेक अग्निहोत्री म्हणाले, “ठीक आहे… या नवीन जगात, जेव्हा तुम्ही एखाद्याशी सहमत नसतात त्यावेळी त्यांच्यावर टीका करतात .
जेव्हा तुम्हाला एखाद्याची कृती आवडते तेव्हा तुम्ही त्याच कौतुक करतात आणि याला डबल स्टँडर्ड म्हणतात. बरं, मला वाटतं याला नि:पक्षपात म्हणतात. जो कोणी भारताचा अभिमान वाढवेल.. तो कौतुकास पात्र आहे.
यापुर्वी विवेक अग्निहोत्री यांनीही दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनीच्या सीनवर आक्षेप घेतला होता. विवेक अग्निहोत्री यांनी दीपिकावर अनेकदा टीका केली आहे एक व्हिडीओही बनवला होता.
मात्र, दीपिकाचे कौतुक करणाऱ्या पोस्टमध्येही त्यांनी तिचे नाव घेतले नाही. यावरही अनेकांनी त्यांना खूप ट्रोल केलं होत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.