Vivek Agnihotri on Salaar Dainik Gomantak
मनोरंजन

Vivek Agnihotri on Salaar : बकवास ! सालारच्या टिजर रिलीजनंतर विवेक अग्नीहोत्रींची प्रतिक्रिया?

अभिनेता प्रभासचा आगामी चित्रपट सालारचं टिजर नुकतंच रिलीज झालं आहे,त्यावर आता विवेक अग्नीहोत्रींनी प्रतिक्रिया दिली आहे.

Rahul sadolikar

Vivek Agnihotri on Salaar : साऊथ स्टार प्रभासचा आगामी चित्रपट 'सालार'चा टीझर रिलीज झाला असून, या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. आता बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रभासचे नाव न घेता, त्याचा चित्रपट आणि अॅक्शन 'बकवास' म्हटले आहे. त्यांचे ट्विट सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

विवेक अग्नीहोत्री सालारच्या टिजरवर बोलले

प्रभासचा आगामी चित्रपट 'सालार'चा टीझर रिलीज झाला आहे. KGF आणि KGF 2 चे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाचा टीझर समोर येताच ट्विटरवर निराशेचा ट्रेंड सुरू झाला. काही लोक असे म्हणू लागले की त्यांना टीझर पाहण्यात मजा आली नाही, कारण हा रॉकी भाईच्या (यश) चित्रपटाची कॉपी आहे.

 टीझरबाबत जनतेच्या मतानंतर आता 'कश्मिर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही नाव न घेता निर्मात्यांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी एकापाठोपाठ एक असे अनेक ट्विट केले आहेत, जे व्हायरल होत आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये 'मिशन इम्पॉसिबल: डेड रेकनिंग' या हॉलिवूड चित्रपटाचेही कौतुक केले आहे.

सालार पार्ट 1

प्रभासच्या ' सालार पार्ट 1 - सीझफायर' या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, टिन्नू आनंद, जगपती बाबू आणि ईश्वरी राव असे अनेक स्टार्स आहेत. हा तेलगू चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. त्याचे बजेट 200 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

विवेक अग्नीहोत्रींनी नाव नाही घेतले ;पण

आता विवेक अग्निहोत्रीच्या प्रतिक्रियेबद्दल सांगायचे तर त्यांनी कोणत्याही चित्रपटाचे नाव घेतलेले नाही, पण 'सालार'चा टीझर समोर आल्यानंतरच त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अशा स्थितीत त्यांनी प्रभासच्याच चित्रपटाला लक्ष्य केल्याचे लोकांचे म्हणणे आहे. 

'मोठ्या आवाजात मूर्खपणाची कृती' असलेल्या चित्रपटांची त्यांनी खिल्ली उडवली आहे. सिनेमा हिंसाचाराला ग्लॅमर करत असल्याचंही म्हटलं आहे.

"हिंसेला चित्रपटात ग्लॅमर दिलं जातं"

एका यूजरच्या ट्विटवर विवेक अग्निहोत्रीने लिहिले की, 'आता सिनेमात हिंसेला ग्लॅमर करणे देखील एक प्रतिभा मानली जाते. बकवास सिनेमाला प्रमोट करणं ही एक मोठी प्रतिभा मानली जाते. नॉन-अॅक्टरला सर्वात मोठा स्टार म्हणून प्रमोट करणे ही सर्वात मोठी प्रतिभा मानली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Har Ghar Tiranga: हर घर तिरंगा! गोव्यात मंत्री, राजकीय नेत्यांनी घरी फडकवला भारतीय ध्वज

Goa Beef Shortage: गोव्यात सलग दहाव्या दिवशीही 'बीफ'ची टंचाई कायम, व्यापारी आक्रमक; मुख्यमंत्र्यांना निवेदन

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरचं 'गोवा व्हेकेशन'! मित्रांसोबत घेतेय सुट्ट्यांचा आनंद; स्टायलिश आणि बोल्ड अंदाजातील फोटो केले शेअर

Left Handers Day: प्राणी, पक्षी डावखुरे असतात काय? एखाद्याला प्रशिक्षित करून डावखुरा करणे शक्य आहे का?

Goa Live News: वाढत्या गुन्ह्यांबद्दल आपचे आमदार कॅप्टन व्हेंझी यांनी दक्षिण गोवा एसपींना केले निवेदन सादर

SCROLL FOR NEXT