kangana Ranaut and Vishal Dadlani Dainik Gomantak
मनोरंजन

'स्वातंत्र्य भीक मागून मिळालं' असं म्हणणाऱ्या कंगनाला...

माझ्या टी-शर्टवर भगतसिंग आहे, जो नास्तिक, कवी, तत्त्वज्ञ, स्वातंत्र्यसैनिक, भारताचा मुलगा आणि शेतकऱ्याचा मुलगा आहे.

दैनिक गोमन्तक

कंगना रणौतने (kangana Ranaut) अनेकदा तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. नुकतेच तिने भारताच्या स्वातंत्र्याबाबत (India's independence) एक वादग्रस्त विधान केले होते, त्यावरून बराचसा गदारोळ उठला थांबण्याचे नाव घेत नाही. कंगना सतत स्पष्टीकरण देत असते, ती कोणाच्या ना कोणाच्या टीकेला बळी पडावे लागते. गायक विशाल ददलानी (Vishal Dadlani) याने एका पोस्टद्वारे भगतसिंग (Bhagat Singh) यांच्या बलिदानाची आठवण करून देत कंगनाचा

विशाल ददलानीने इंस्टाग्रामवर (Instagram) त्याचा फोटोसह एक (kangana Ranaut and Vishal Dadlani) व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो काळ्या रंगाचा टी-शर्ट घालून बसला आहे आणि त्या टी-शर्टवर भगतसिंग यांचा फोटो आहे. विशालने इंस्टाग्रामवरील त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'आम्हांला स्वातंत्र्य भीक मागुण मिळाले आहे' असे म्हणणाऱ्या महिलेला आठवण करून द्या. माझ्या टी-शर्टवर भगतसिंग आहे, जो नास्तिक, कवी, तत्त्वज्ञ, स्वातंत्र्यसैनिक, भारताचा मुलगा आणि शेतकऱ्याचा मुलगा आहे. वयाच्या 24 व्या वर्षी त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले.

विशाल पुढे लिहीत- सुखदेव (Sukhdev Thapar), राजगुरू (Shivaram Rajguru), अशफाकुल्ला (Ashfaqulla Khan) आणि इतर हजारो शहीदांची आठवण करून देण्यासाठी लिहिले ज्यांनी नतमस्तक होण्यास नकार दिला. त्याला नम्रपणे आठवण करून द्या जेणेकरून तो पुन्हा कधीही विसरण्याची हिंमत करणार नाही. विशालने एका पोस्टद्वारे कंगना रणौतला दयाळूपणे उत्तर दिले आणि तिच्या चाहत्यांनाही त्याला नम्रपणे आवाहन केले आहे.

प्रसार माध्यंमांच्या दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौत म्हणाली होती की, आपल्याला भीक मागुन स्वातंत्र्य मिळाले आहे. तेव्हापासून बरेच वाद निर्माण झाले आहेत. तिच्या या वक्तव्यावर सर्वत्र टीका होत आहे. अनेक ठिकाणी तिच्यावर पोलिस स्टेशन मध्ये एफआयआरही दाखल करण्यात आली आहे. तिच्यावर देशद्रोहाचा खटला चालवावा, असे अनेक राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. सततच्या वादात असल्यामळे कंगनाने काल एक लांबलचक इंस्टाग्राम स्टोरी टाकून तिच्या विधानाचे समर्थन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravindra Jadeja ODI Career: रवींद्र जडेजाची वनडे कारकीर्द संपुष्टात? न्यूझीलंड मालिकेपूर्वी चेतेश्वर पुजाराच्या वक्तव्यानं क्रिकेट वर्तुळात खळबळ

Diwali Magazine Tradition: गोव्याच्या साहित्यविश्वाचा दिवाळी फराळ! जाणून घ्या दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा

Parliament Fight Video: संसद बनली कुस्तीचा आखाडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्या अन् पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT