Vidya Balan Dainik Gomantak
मनोरंजन

Viral Video: पंकज उधास यांच्या अंत्यदर्शनावेळी विद्याच्या चाहत्याची हद्द पार; नेटकरी म्हणाले 'तुरुंगात टाका'

Viral Video: आता गझल गायक पंकज उधास यांच्या निधनानंतर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन पोहचली होती.

दैनिक गोमन्तक

Viral Video Vidya Balan at pankaj udhas last rite fan tried to take a selfie in marathi

बॉलीवूडचे कलाकार हे चाहत्यांसाठी अनेकदा उत्सुकतेचा विषय असतात. ते जर प्रत्यक्ष समोर आले तर त्यांचा फोटो कॅमेरात कैद करण्यासाठी गोंधळ झाल्याच्या अनेक घटना इतिहासजमा आहे. बऱ्याचवेळा यामुळे वाददेखील झाल्याचे पाहायला मिळत असतात.

आता गझल गायक पंकज उधास यांच्या निधनानंतर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन पोहचली होती. त्यावेळी एका चाहत्याने सेल्फी काढण्यासाठी प्रयत्न केला आहे. अशा दु:खद प्रसंगी सेल्फी घेऊ नये यासाठी विद्याची टीम सांगताना दिसत आहे आणि फोटो काढण्यास मनाई करत आहे. मात्र हा इसम सातत्याने फोटो काढताना दिसत आहे. यादरम्यान विद्या बालनने कोणतीही रिएॅक्शन दिली नाही सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

नेटकरी या व्हिडिओतील व्यक्तीला मोठ्या प्रमाणात ट्रोल करताना दिसत आहेत. एकाने म्हटले आहे की, 'इतक्या संवेदनशील ठिकाणी हे लोक असे कसे वागू शकतात ?' दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, हा मानसिक छळ आहे.' एका युजरने म्हटले आहे की, 'माणूस फक्त शरीराने मोठा झाला आहे, मेंदूने लहान आहे.' आणखी एका नेटकऱ्याने म्हटले आहे की 'याला तुरुंगात टाकले पाहिजे.' यासोबतच, विद्याने कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याने चाहते तिचं कौतुक करतानादेखील दिसत आहे.

दरम्यान, पद्मश्री पुरस्कार विभूषित प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे स्वादुपिंडच्या कर्करोगाने वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने संगीतसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे आणि ती पोकळी कोणीही भरुन काढू शकत नाही. त्यांची गाणी थेट हृदयाला भिडत असत अशा प्रकारच्या भावना व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT