Naseeruddin Shah  Dainik Gomantak
मनोरंजन

Naseeruddin Shah: 'तुम्ही माझं डोकं फिरवलं' प्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडिओ झाला व्हायरल

Naseeruddin Shah: दिल्ली विमानतळावर दिसले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता आणि हातात पुस्तक होते.

दैनिक गोमन्तक

Naseeruddin Shah lashes out at fans who wanted to click selfies with him

बॉलीवूडच्या कलाकारांबद्दल सामान्य प्रेक्षकांना मोठी उत्सुकता असते, हे कलाकार विविध माध्यमातून, अनेक गोष्टींमुळे सातत्याने चर्चेत असतात. मात्र हे कलाकार अचानक समोर आले तर त्यांच्यासोबत एक फोटो काढण्यासाठी चाहते अनेक प्रयत्न करताना दिसतात. आता बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते नसरुद्धीन शहा यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ते चाहत्यांवर ओरडताना दिसले आहेत.

नुकतेच अभिनेता दिल्ली विमानतळावर दिसले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता आणि हातात पुस्तक होते. त्यानंतर चाहते त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी गोंधळ करत होते. मात्र नसीरुद्दीन शाह संतापले आणि त्यांनी त्यांच्यावर आरडाओरडा सुरू केला. 'तुम्ही लोकांनी माझी मन:शांती बिघडवली आहे. डोकं फिरवलं आहे, कुठेही जाऊ दे तुम्ही मला एकटे सोडत नाही' अशा आशयाचे वाक्ये ते बोलत असलेले या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

आता नेटकरी या व्हिडिओवर अनेक कंमेट करताना दिसत आहेत. एका युजरने म्हटले आहे, वयाचा परिणाम आहे. दुसरा एक युजर म्हणतो- अशा कलाकारांना महत्व देणे कमी केले पाहिजे. आणखी एका युजरने म्हटले आहे-काही अभिनेते अभिनयासाठी ओळखले जातात.

दरम्यान, नसरुद्दीन शहा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मोठ्या चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी मी हिंदी चित्रपट पाहणे सोडल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे ते चर्चेत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT