Vikrant Massey Dainik Gomantak
मनोरंजन

Vikrant Massey: विक्रांतने का ठेवलं मुलाचं नाव 'वरदान'? पोस्ट शेअर करत सांगितलं कारण

Vikrant Massey: विक्रांत मेस्सी आणि त्याची पत्नी शीतल ठाकूर यांनी त्यांच्या मुलाचे 'वरदान' असे ठेवले आहे.

दैनिक गोमन्तक

Vikrant Massey: 12th फेल चित्रपटांमुळे चर्चेत आलेला आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेला विक्रांत मेस्सी काही दिवसांपासून आपल्या मुलामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मिडियावर आपल्याला पुत्ररत्न प्राप्त झाल्याची आनंदाची बातमी सोशल मिडियावर शेअर केली होती. आता त्याच्या घरी मुलाच्या नामकरणाचा सोहळा पार पडला आहे. विक्रांत मेस्सीने चाहत्यांना मुलाचे नाव काय ठेवले याची माहिती सोशल मिडियाद्वारे दिली आहे.

विक्रांत मेस्सी आणि त्याची पत्नी शीतल ठाकूर यांनी त्यांच्या मुलाचे 'वरदान' असे ठेवले आहे. आपल्या पत्नीसह बाळाचा फोटो पोस्ट करताना त्याने म्हटले आहे की- 'आशिर्वादापेक्षा आमचे बाळ कमी नाही, आम्ही त्याचे नाव 'वरदान' असे ठेवले आहे.'

याआधी त्याने सोशल मिडियावर पोस्ट करत मुलगा झाल्याची बातमी दिली होती. त्यावेळी एक नोट त्याने लिहली होती. ७.०२.२०२४ ला पुत्ररत्न प्राप्त झाल्याचे, आमच्या घरी आमच्या मुलाचे आगमन झाले असल्याचे त्याने या नोटमध्ये लिहले होते.

दरम्यान, विक्रांत मेस्सी याआधी अनेक वेब सीरीज, मालिका आणि काही चित्रपटांमध्ये दिसून आला आहे. मात्र त्याला 12th फेल या चित्रपटाने वेगळी ओळख मिळवून दिली. या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकांचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.

विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित आहे. करिनापासून आलिया, कंगनापर्यंत सर्वांनी या चित्रपटाचे आणि विक्रांतने निभावलेल्या भूमिकांचे कौतुक केले आहे. विक्रांतने शेअर केलेल्या पोस्टनंतर चाहते त्याचे अभिनंदन करताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

15 मिनिटांच्या आत पाकिस्तानी सैन्याने केले 'सरेंडर', तालिबानने शस्त्रेही घेतली हिसकावून; रणगाडे आणि शस्त्रे जप्त केल्याचा दावा VIDEO

Ravi Naik: गोंयचो पात्रांव अनंतांन विलीन! रवी नाईक यांना 21 बंदुकींच्या सलामीसह अखेरचा निरोप

Bicholim: मोठी दुर्घटना टळली! डिचोलीत सिलिंडर गळतीमुळे शेगडी पेटली, फ्लॅटमालक आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले, लोक ओक्साबोक्शी रडले; रवींच्या अंत्यदर्शनाला लोटला जनसागर

राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू, सहा दिवसांसाठी मुख्यमंत्री ते गोव्याच्या राजकारणाचे 'कर्णधार'; 'रवी नाईक' यांची अनोखी कहाणी!

SCROLL FOR NEXT