Vikram Bhatt Dainik Gomantak
मनोरंजन

Vikram Bhatt On Adipurush: विक्रम भट्ट यांची आदिपुरुषवर टीका म्हणाले - हे रामायण आहे कि फक्त...

Vikram Bhatt: हा असा एकमेव चित्रपट आहे जो महात्मा गांधींनी पाहिला होता.

दैनिक गोमन्तक

Vikram Bhatt: आदिपुरुष रिलिज झाल्यापासून या चित्रपटावर मोठी टीका होताना दिसत आहे. चित्रपटातील व्हीएफएक्सचा सुमार दर्जापासून ते संवादापर्यत आदिपुरुष टीकेचा धनी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाला फक्त भारतातूनच नाही तर नेपाळमधूनही विरोध झाला आहे. आदिपुरुषने देवतांचा अपमान करत लोकांच्या भावनांचा अपमान केल्याचे म्हणत चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी अनेक हिंदू संघटनांनी केली आहे.

आता या वादात चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांनी उडी घेतली आहे. ते म्हणतात- 'मी अजून आदिपुरुष पाहिला नाही मात्र सोशल मिडियावर उपलब्ध असलेल्या चित्रपटातील काही क्लिप पाहिल्या आहेत. माझा निर्मात्यांना एक प्रश्न आहे- हा चित्रपट रामायणावर आधारित आहे की नाही? आणि जर रामायणावर आधारित असेल तर त्यामध्ये वेगळ्या पद्धतीने बदल करणे भावनिक आहे. कारण आपल्या पिढ्यांपिढया रामायण वाचत मोठ्या होतात.'

एका मुलाखतीदरम्यान विक्रम भट्ट यांनी म्हटले आहे कि, 'माझ्या मनात आदिपुरुष रामायण आहे की नाही याबद्दल संभ्रम आहे. मला सांगितले गेले आहे की चित्रपटाच्या सुरुवातीच्या डिसक्लेमरमध्ये हे रामायण नसून रामायणापासून प्रेरित आहे असे म्हटले आहे. परंतु तरीदेखील त्यांना हनुमानजी या चित्रपटात हवे होते. म्हणजे हे रामायण आहे की नाही हे फक्त निर्माते ठरवू शकतात.'

पुढे ते म्हणतात- माझ्या आजोबांनी 1943 मध्ये रामायणावर आधारित रामराज्य या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा असा एकमेव चित्रपट आहे जो महात्मा गांधींनी पाहिला होता. अशा प्रकारचे चित्रपट मनोरंजन किंवा चित्रपटांची वाढणारी संख्या याचा भाग नसतात. असे चित्रपट लोकांच्या भावना, विश्वास आणि पूजाअर्चेचा भाग असतात.

जून्या काळात लोक त्यांच्या आवडत्या देवाचे मंदीर बांधायचे ते कोणत्याही नफ्या तोट्यासाठी नसायचे. ती त्यांची भक्ती आणि कृतज्ञता असायची. मला वाटते जर तुम्ही अशा प्रकारचे काही करत असाल, तुम्ही लोकांना पूजा करण्यासाठी बोलवत असाल तर ते पूजा करण्यासारखे असायला हवे.

दरम्यान, 600 करोड बजेट असलेला चित्रपटावर चौफेर टीका होताना दिसत असून आता आदिपुरुष बॉक्स ऑफीसवर किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cuchelim Comunidad: 140 बांधकामांवर फिरणार बुलडोझर! कुचेली कोमुनिदाद जागेत अतिक्रमण; उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

गोव्यातील बेकायदेशीर घरांना वीज आणि पाणी कनेक्शन मिळणार नाही: मुख्यमंत्री सावंत असं का म्हणाले?

Goa Opinion: कुछ भी करो, चलता है! गोव्याला जबाबदार पर्यटक अन् कठोर नियमांची गरज

Cash For Job Scam: सरकारी नोकऱ्यांची विक्री म्हणजे गोव्याला झालेले 'गँगरीन'; आता 'बड्या' माशांचे काय? संपादकीय

Cash For Job Scam: सागर नाईकविरोधात आणखी एका गुन्ह्याची नोंद; 10 लाखांचा गंडा घातल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT