Kushi Box Office Collection Dainik Gomantak
मनोरंजन

Box Office Collection: फक्त 'गदर'चाच नाही तर विजय- समंथाच्या 'कुशी'चाही बॉक्स ऑफिसवर धुडगूस...

Rahul sadolikar

Kushi Box office Collection: अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेलच्या गदरचा गेल्या काही काळापासुन बॉक्स ऑफिसवरच चांगलाच बोलबाला सुरू आहे.

एकीकडे गदर 2 तर दुसरीकडे रजनीकांतचा जेलर कमाईमध्ये मोठमोठे उच्चांक गाठत आहे.

एका बाजूला रजनीकांत आणि सनी देओलची जादू चालत असताना विजय देवराकोंडा आणि समंथाचा कुशीही या शर्यतीत मागे राहिला नाही.

चला पाहुया कुशी चित्रपटाच्या कमाईबद्दल आणि चित्रपटाच्या कथेबद्दल.

कुशी या दिवशी रिलीज झाला

समंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा - स्टारर कुशी, शुक्रवारी (1 सप्टेंब) प्रदर्शित झाला. कुशीने सुरुवातीच्या वीकेंडमध्ये चांगली कामगिरी केली. 

तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदीमध्ये डब केलेल्या या तेलगू चित्रपटाने पहिल्या आठवड्यात थिएटरमध्ये अंदाजे ₹ 36 कोटींहून अधिक कमाई केली आहे, असे Sacnilk.com च्या अहवालात म्हटले आहे

कुशीची कमाई

रविवारी (3 सप्टेंबर) विजय देवराकोंडा आणि समंथाची मुख्य भूमीका असणाऱ्या कुशीने भारतातल्या सर्व भाषांमध्ये अंदाजे ₹ 11 कोटींची कमाई केली. चित्रपटाने शुक्रवारी ₹ 15.25 कोटींचं नेट ओपनिंग केले होते.

'कुशी'ने तेलुगुमध्ये ₹ 14.7 कोटी आणि तमिळमध्ये ₹ 55 लाखांचे कलेक्शन केले होते. शनिवारी मात्र कुशीच्या कमाईचा आलेख घसरला. कुशीची कमाई दुसऱ्या दिवशी 35.08 लाख इतकीच होऊ शकली.

एकुण कमाई पाहता कुशीने सर्व भाषांमध्ये 9.9 कोटी इतके कलेक्शन केले. यात तेलुगू व्हर्जनने ₹ 9.25 कोटी कमावले, तर तामिळ भाषेत 65 लाखांचा कमाई करण्यात चित्रप यशस्वी झाला. सुरुवातीच्या अंदाजानुसार , चित्रपटाची भारतातील एकूण कमाई आता सर्व भाषांमध्ये ₹ 36.15 कोटी इतकी आहे.

कुशीची कथा काय आहे?

कुशी 1 सप्टेंबर रोजी रिलीज झाला आणि रिलीजच्या दिवसापासुन चित्रपटाने कमाईचा आलेख चढताच राहिला. कुशीची कथाही प्रेक्षकांना भावली आहे.

या चित्रपटात विजयने साकारलेला विप्लव आणि समंथाने साकारलेली आराध्या त्यांच्या आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न करतात.

सुरूवातीचे काही दिवस सुरळित जातात ;पण नंतर मात्र दोघांच्यात वाद आणि जेलसी निर्माण होते. वाद इतके टोकाला जातात की नातं तुटण्याची वेळ येते.

शिव निर्वाण लिखित आणि दिग्दर्शित या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात सचिन खेडेकर, सरन्या पोनवन्नन आणि मुरली शर्मा सहाय्यक भूमिकेत आहेत. त्याची निर्मिती Mythri Movie Makers ने केली आहे.

विजय देवराकोंडाची अकरावी फिल्म

या चित्रपटाची अधिकृतपणे एप्रिल 2022 मध्ये घोषणा करण्यात आली होती, आणि त्याला सुरूवातीला VD11 असे नाव देण्यात आले होते, कारण ती विजय देवरकोंडाची अकरावी मुख्य भूमिका होती, तर कुशी हे नाव मे मध्ये घोषित करण्यात आले होते. 

चित्रपटाचे शूटिंग एप्रिल 2022 मध्ये काश्मीरमध्ये सुरू झाले आणि जुलै 2023 मध्ये पूर्ण झाले. गेल्या वर्षी, समंथाला मायोसिटिसचे निदान झाल्यामुळे चित्रीकरण थांबवण्यात आले होते.

विजय दिसणार या चित्रपटात

कुशीला मिळालेल्या यशानंतर अलीकडेच विजय देवरकोंडा यांनी आपल्या कुटुंबासह तेलंगणातील यादद्री मंदिराला भेट दिली . 

विजय लवकरच गौतम तिन्नानुरी यांच्या नवीन चित्रपटात श्रीलीलासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे, या चित्रपटाचं सध्याचं नाव VD 12 आहे.

दुसरीकडे, सामंथा, वरुण धवनसोबत सिटाडेल या अॅक्शन सिरीजच्या इंडियन वर्जनमध्ये दिसणार आहे . राज आणि डीके यांनी तयार केलेली ही सिरीज प्राइम व्हिडिओवर प्रसारित होईल.

ओल्ड गोवा येथे दुचाकीच्या अपघातात 17 वर्षीय तरुण ठार, डिचोलीत गॅरेजमधील दुचाकींना आग; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Mahalaya Pitru Paksha Shraddh 2024: श्राद्ध का करावे?

Ratnagiri Crime: स्वप्न, मृतदेह! खेड, रत्नागिरी प्रकरणात नवा ट्विस्ट; आर्याचा भोस्ते घाटात होता वावर

Goa Weather Update: गोव्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता, दोन दिवस 'यलो अलर्ट'

Goa Blitz Chess Tournament: ब्लिट्झ फिडे बुद्धिबळ स्पर्धेत नीतिश विजेता; अपराजित राहून सर्वाधिक साडेदहा गुणांची कमाई

SCROLL FOR NEXT