Vicky Kaushal and Bear Grylls Dainik Gomantak
मनोरंजन

विकी कौशलला लागले ‘INTO THE WILD’ चे वेड

अक्षय कुमार, अजय देवगण नंतर विकी कौशल लवकरच दिसुन येणार ‘INTO THE WILD’ शो मध्ये

दैनिक गोमन्तक

विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात खूप चर्चेत आहे. कतरिना कैफ (Katrina Kaif) सोबतच्या त्याच्या लग्नाच्या अफवांमुळे तो चर्चेत असतानाच त्याच्या सरदार उधम (Sardar Udham) या चित्रपटाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अभिनेत्याने उरी: सर्जिकल स्ट्राइक (Uri the surgical strike) सारख्या चित्रपटांमधुन आपली क्षमता सिद्ध केली आहे आणि आता, बेअर ग्रिल्स (Bear Grylls) सह इनटू द वाइल्ड (Into The Wild) च्या आगामी भागामध्ये विकी दिसुन येणार आहे.

विकीने शो च्या नवीन एपिसोडचे पोस्टर आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे, ज्यामध्ये तो बेअर ग्रिल्ससोबत शोमध्ये येण्यासाठी पूर्णपणे सज्ज दिसत आहे. पोस्टर शेअर करताना, विक्की कौशलने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आयुष्यातले सर्वात साहसीक कार्य बेअर ग्रिल्सशिवाय इतर कोणीही करु शकत नाही आणि मी त्या शो चा एक भाग बनण्यासाठी सज्ज आहे'. विशेष म्हणजे विकी, अक्षय कुमार, अजय देवगण, रजनीकांत (Rajinikanth), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) इत्यादी सेलिब्रिटींच्या लीगमध्ये सामील झाला आहे, जे यापूर्वी या शोचा भाग होते. विकी कौशलचा हा एपिसोड यावर्षी १२ नोव्हेंबरला प्रसारित होणार आहे.

दरम्यान, कतरिना कैफसोबतच्या त्याच्या लग्नाबाबत अनेक गॉसिप आहेत. मीडिया रिपोर्ट्सने असेही सुचवले आहे की यावर्षी हे जोडपे डिसेंबरमध्ये लग्न करू शकतात. कामा बद्दल बोलायचे गेले तर, विकी कौशल सरदार उधम चित्रपटामध्ये दिसुन आला होता. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. यासोबतच विकी कौशल 'अश्वथामा' आणि 'तख्त' ही मध्ये दिसणार आहे. कतरिना कैफबद्दल बोलायचे झाले तर ती अलीकडेच अक्षय कुमार (Akshay Kumar), रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अजय देवगण (Ajay Devgn) सोबत सूर्यवंशी चित्रपटात दिसली आहे, या चित्रपटाला चाहत्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arvind Kejriwal: 2027 मध्ये गोव्यात 'आम आदमी'चे सरकार; केजरीवालांना आत्मविश्वास, काँग्रेसवर भाजपला मदत केल्याचा आरोप

Government Advisory on Cough Syrup: '2 वर्षांखालील मुलांना 'कफ सिरप' देऊ नका!' मृत्यूतांडवानंतर आरोग्य मंत्रालयाकडून सर्व राज्यांना महत्त्वाची सूचना

Parra Dussehra 2025: वीरश्रीची प्रचिती आणणारा, विधी-परंपरांचा आविष्कार उत्स्फूर्तपणे घडवणारा 'पर्ये गावचा दसरा'

Horoscope: धनलाभ, नोकरी आणि यश! शुक्र-केतू युतीचा 'या' 3 राशींना मोठा फायदा; दिवाळीपूर्वीच चमकेल नशीब

मोपावरुन पहिल्यांदाच 'अंटार्क्टिका'कडे झेपावले मालवाहू विमान, वेगाने हाणार रसद पुरवठा

SCROLL FOR NEXT