Vicky Kaushal in Chh. Sambhaji Maharaj's Role  Dainik Gomantak
मनोरंजन

Vicky Kaushal in Chh. Sambhaji Maharaj's Role: छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीकेत दिसणार हा अभिनेता, दिग्दर्शकाने दिली माहिती

अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीकेत दिसणार आहे

Rahul sadolikar

Vicky Kaushal in Chh. Sambhaji Maharaj's Role: छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अत्यंत पराक्रमाचा आणि छ.शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या रक्षण करण्यासाठी केलेल्या बलिदानाचा आहे.

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा हा धगधगता इतिहास आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अभिनेता विकी कौशल या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीकेत दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेता त्याच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. या चित्रपटात सारा अली खानही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

विकी कौशल त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असताना दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

एका मुलाखतीदरम्यान दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी त्यांच्या आगामी 'छत्रपती संभाजी महाराज' या चित्रपटाबद्दल सांगितले. 

हा अभिनेता साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमीका

अभिनेता विकी कौशल लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

दिग्दर्शक उतेकर म्हणाले, 'छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी मी विकीची लुक टेस्टही केली नाही कारण तो या भूमिकेसाठी योग्य आहे हे मला माहीत होतं.

त्याच वेळी, आता बातमी समोर आली आहे की विकी देखील या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे आणि चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे.

याबाबत एका प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "जरा हटके जरा बचके या चित्रपटाच्या प्रमोशनमधून मुक्त होताच लक्ष्मण उतेकर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्री-प्रॉडक्शनवर काम करणार आहेत. त्यांनी यावर खूप काम केले आहे. आता स्क्रिप्ट पुढे नेत आहे."

विकी दिसणार या दुसऱ्या चित्रपटात

अभिनेता विकी कौशल लवकरच मेघना गुलजारच्या 'साम बहादूर' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा ​​यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

त्याचबरोबर विकी हा आनंद तिवारीच्या मेरे मेहबूब मेरे सनम या चित्रपटाचाही एक भाग आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरीही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 

जरा हटके जरा बचके हा चित्रपट २ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सारा अली खान, राकेश बेदी, अनुभा फतेहपुरिया, नीरज सूद, शारीब हाश्मी आणि एनामुल हक यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lionel Messi In India: 3 दिवस, 4 शहरं… मेस्सी भारत दौऱ्यावर! कधी, कुठे आणि कोणत्या कार्यक्रमात उपस्थित राहणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Goa ZP Election 2025: भाजप 40, मगोच्या वाट्याला 3 जागा तर सात जागांवर अपक्ष उमेदवार; सत्ताधाऱ्यांचा फॉर्म्युला फिक्स

Watch Video: संघ हरला म्हणून राग आला, चाहत्यांनी स्टेडियमच पेटवलं; क्षणात सगळं जळून खाक, आग लावणारे 15 वर्षांखालील मुलं

चोरीसाठी चोरट्याचा अजब जुगाड! सुपरमार्केटमध्ये पिशवी घेवून गेला अन्…. Viral Video एकदा बघाच

अग्रलेख: कष्टकऱ्यांचा आनंदोत्सव! ख्रिस्तीकरणानंतरही पूर्वकालीन संकेत विसरले नाहीत; गोमंतकीयांच्या भक्तीचा 'सांगडोत्सव'

SCROLL FOR NEXT