Vicky Kaushal-Katrina Kaif to host grand reception on this day

 

Dainik Gomantak

मनोरंजन

विकी कौशल-कतरिना कैफ 'या' दिवशी होस्ट करणार ग्रँड रिसेप्शन

कतरिना कैफ आणि विकी कौशल सवाई माधोपूरमध्ये लग्न आणि सीक्रेट प्लेसवर हनीमून केल्यानंतर मुंबईत परतले आहेत.

दैनिक गोमन्तक

कतरिना कैफ आणि विकी कौशल सवाई माधोपूरमध्ये लग्न आणि सीक्रेट प्लेसवर हनीमून केल्यानंतर मुंबईत परतले आहेत. कतरिना (Katrina Kaif) आणि विकीच्या (Vicky Kaushal) लग्नानंतर त्यांच्या ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीच्या चर्चा आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या रिसेप्शन पार्टीची तारीख आणि ठिकाण निश्चित झाले आहे. कॅट-विक्कीच्या (Katrina Kaif-Vicky Kaushal) लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सर्व बड्या स्टार्सना आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी-कतरिनाच्या जवळच्या मित्रांनी सांगितले आहे की, कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहता पुन्हा एकदा रिसेप्शन देण्यात येणार आहे. कॅट-विकीच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये बीएमसीने घालून दिलेले सर्व प्रोटोकॉल आणि नियम पाळले जातील.

रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाचे रिसेप्शन 20 डिसेंबरला आहे. कॅट-विकी मुंबईतील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये एका भव्य रिसेप्शन पार्टीचे आयोजन करणार आहेत. कॅट-विकीने 20 तारखेला फायनल केले आहे कारण कतरिना आणि तिचे कुटुंब ख्रिसमस उत्साहात साजरा करतात. ख्रिसमसच्या आधी त्याला रिसेप्शन पार्टी द्यायची होती जेणेकरून तो सण चांगला साजरा करू शकेल.

विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाच्या रिसेप्शनला सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान, रणबीर कपूर, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक मोठे स्टार्स उपस्थित राहणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या रिसेप्शनचं इनविटेशन पाहुण्यांना आधीच पाठवली गेली आहेत. रिपोर्ट्सनुसार, विकी-कॅटच्या रिसेप्शनला येण्यासाठी सर्व पाहुण्यांना आरटीपीसीआर (RTPCR) रिपोर्ट सोबत आणावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

Goa Assembly Session: समुद्रकिनाऱ्यांवरून बेकायदेशीर दलाल आणि मार्गदर्शकांना हटवा

Gautam Gambhir Fight: तू येथून निघ... पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी गौतम गंभीरचं इंग्लंडमध्ये झालं भांडण! पाहा VIDEO

धारगळच्या कमांड एरियातील जमीन केवळ कॅसिनोसाठी डेल्टा कंपनीला दिली; आलेमाव यांचा आरोप

Goa University: प्रेयसीसाठी प्राध्यापकाने प्रश्नपत्रिका चोरी केल्याचे प्रकरण विधानसभेत गाजले; कायद्यात दुरुस्ती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT