Vicky Kaushal Viral Video Dainik Gomantak
मनोरंजन

Vicky Kaushal Viral Video: बायकोच्या गाण्यावर विकी कौशलने केला राखी सावंतसोबत केला डान्स...व्हिडीओ बघा

अभिनेता विकी कौशलने शीला की जवानी या कॅटरिना कैफच्या गाण्यावर चक्क राखी सावंतसोबत डान्स केला.

Rahul sadolikar

Vicky Kaushal Viral Video: नुकत्याच झालेल्या आयफा अवॉर्ड फंक्शनमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी चांगलेच धमाल करताना दिसले. विकी कौशलपासून ते ईशा गुप्ता, सारा अली खान, नोरा फतेही, क्रिती सेनॉन आणि जॅकलिन फर्नांडिससुद्धा इथं दिसले. 

हा अवॉर्ड शो सलमान खानने होस्ट केला होता. या अवॉर्ड शोमध्ये राखी सावंतही उपस्थित होती आणि आपल्या नेहमीप्रमाणे तिने सगळ्यांसोबत खूप धमाल केली आणि डान्स केला. राखी सावंतने विक्की कौशलसोबत डान्स केला, या अफलातून डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

राखी सावंतसोबत डान्स

या अवॉर्ड शोमध्ये विकी कौशलने राखी सावंतसोबत पत्नी कतरिना कैफच्या 'शीला की जवानी' या हिट गाण्यावर डान्स केला.

विकी कौशल त्याच्या डान्स स्टेप्स करताना मजा करत होता. 'शीला की जवानी'वर राखी सावंत कतरिनाच्या डान्स मूव्ह्ज कॉपी करत होती. हा डान्स बॉलिवूडच्या इतर सेलिब्रिटींनीही एन्जॉय केला.

सलमानच्या त्या व्हिडीओवर विकीचा दावा

काही काळापूर्वी विकी कौशल तेव्हा प्रकाशझोतात आला जेव्हा या अवॉर्ड शोदरम्यान चाहत्यांनी दावा केला की सलमान खानने अभिनेत्याकडे दुर्लक्ष केले. यावरून बराच वाद झाला होता. 

त्यानंतर विकी कौशलने यावर स्पष्टीकरण देताना पीटीआयला सांगितले की, काहीवेळा जे जसे दिसते तसे नसते आणि गोष्टी वाढतात. अशा गोष्टींना काही अर्थ नसतो, असे विकी कौशलने म्हटले होते.

राखी सावंत अन् विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल

राखी सावंत आणि विकी कौशलचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना हसू आवरता येत नाही आणि ते ट्विटरवर प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण राखी सावंतच्या या फनी स्टाइलचे कौतुक करत आहेत तर काही जण विकी कौशलवर दया करत आहेत.

व्यावसायिक आघाडीबद्दल बोलायचे झाले तर, विकी कौशल लवकरच सारा अली खानसोबत 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटात दिसणार आहे.

विकी कौशल अन् सलमानचा तो वाद

अभिनेता विकी कौशल सलमानसोबतच्या त्या व्हिडीओमुळे चर्चेत होता. व्हायरल व्हिडिओमध्ये, सलमान त्याच्या बॉडीगार्डसह प्रवेश करताना विकी कौशल काही अंतरावर उभा असलेला दिसत आहे.

जसजसा सलमान हळू हळू जवळ येत आहे तसतसा विकी सलमानच्या दिशेने हात पुढे करताना त्याला अभिवादन करताना दिसतो. 

पण, एक सुरक्षा कर्मचारी विकीला सलमानपासून दूर ढकलतो, कारण सलमान त्याच्याकडे हात पुढे करत नाही आणि फक्त एक नजर टाकतो आणि निघून जातो.

विकीच्या चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्ट दिसत आहेत. त्यांनी दुसऱ्यांदा हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला, पण सलमानने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि तेथून निघून गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem Market Fire: कुडचडेतील फळ, फूल मार्केट जळून झाले खाक; विक्रेत्यांचे 5 लाखांचे नुकसान झाल्याचा दावा

Porvorim Flyover Meeting: परवरी उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाचो घेतलो नियाळ - रोहन खंवटे

IND vs AUS 2nd ODI: रोहित, कोहलीकडून 'विराट' खेळीची अपेक्षा! अ‍ॅडलेडच्या मैदानावर भारताचा रेकॉर्ड कसा? आकडेवारी पाहा

Mhadei River Dispute: जलसंपदा खात्याचा सखोल 'गृहपाठ' सुरू, म्हादईप्रश्‍‍नी शुक्रवारी विशेष बैठक; अहवालासाठी तज्ज्ञांची मदत

PM Modi Celebrates Diwali: भर समुद्रात देशभक्तीचा उत्‍साह, पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिवाळी नौदलाच्‍या जवानांसमवेत

SCROLL FOR NEXT