Actress Sulochana Latkar Dainik Gomantak
मनोरंजन

Sulochana Latkar : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन

वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Rajat Sawant

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी योगदान दिलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन झाले. दादर येथील सुश्रुषा रुग्णालयामध्ये सुलोचना दीदी यांनी वयाच्या 94व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सुलोचना दीदींनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. सुलोचना लाटकर यांची सुलोचना दीदी या नावानेच कलाक्षेत्रामध्ये ओळख होती. सुलोचनादीदींनी 250 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.

सुलोचना दीदींनी एकटी, धाकटी जाऊ, मीठभाकर, वहिनींच्या बांगड्या, मोलकरीण, पारिजातक अशा 250 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. तर कटी पतंग, संबंध, चिराग, आये दिन बहार के, नाटक अशा 150 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय साकारला होता.

प्रभादेवी येथील घरी सुलोचना दीदी यांचं पार्थिव सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर संध्याकाळी त्यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shivling Waterfall: नो टेन्शन, फक्त एन्जॉय! पालीच्या शिवलिंग धबधब्यावर सुरक्षित पर्यटनासाठी वनखात्याची विशेष व्यवस्था

Goa Education: कुठल्याही वयात द्या परीक्षा, नापास होण्याची भीती कायमची मिटली; काय आहे 'सरकारची खासगी विद्यार्थी योजना'?

Goa Live News: हरमल-भटवाडी येथील संपूर्ण रस्ता पाण्याखाली

Heavy Rain In Margaon: मुसळधार पावसाने मडगावला झोडपले, गांधी मार्केटात पाणी; पालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप

Horoscope: तुम्ही सिंगल आहात? खास व्यक्ती भेटण्याची शक्यता; वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस खास

SCROLL FOR NEXT