Veena Jagtap Dainik Gomantak
मनोरंजन

Shiv Takare : शिव ठाकरेची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगताप अभिनय करणार नाही, इन्स्टाग्रामवर केली पोस्ट

बिग बॉस सिजन 2 ची कंटेस्टंट आणि शिव ठाकरेची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापची पोस्ट सध्या चर्चेत आहे

Rahul sadolikar

Shiv Takare: अभिनेत्रा वीणा जगतापची एक पोस्ट सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनली आहे. वीणा जगतापच्या एका घोषणेने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

बिग बॉस मराठी सीझन २ फेम वीणा जगताप सोशल मिडीयावर नेहमीच स्वत:बद्दल अपडेट देत असते. त्यामुळे चाहत्यांमध्ये वीणाची नेहमी चर्चा असते.

सध्या वीणा एका पोस्टमुळे चर्चेत आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक नवीन घोषणा केली आहे.या पोस्टमध्ये वीणा लिहते, 'किसी को घर से निकलते ही मिल गई मंज़िल.. कोई हमारी तरह उम्र भर सफ़र में रहा.'

पुढे वीणा लिहिते 'मी माझ्या आयुष्यात नेहमीच काही नव्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला आशा आहे की ते चांगलं होईल... आता काही नवीन गोष्ट होण्याच्या मार्गावर आहे'. वीणाने आपल्या चाहत्यांना सांगितले की, ती तिच्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरू करणार आहे.

पोस्टमध्ये वीणा एका वधूचा मेकअप करताना दिसत आहे साहजिकच यावरून असे दिसते की वीणाला आता मेकअप आर्टिस्ट म्हणून करिअर करायचे आहे.

वीणाच्या या पोस्टवर साहजिकच तिचे चाहते व्यक्त झाले आहेत, काहींनी तीला प्रश्नही विचारले आहेत. एका युझरने कमेंट करत विचारले की, 'मेकअप आर्टिस्ट होणार आहेस का? तर दुसऱ्याने विचारले की, 'ओएमजी... मेकअप आर्टिस्ट... तू खूप छान काम केलं.' वीणा फॅन्सच्या प्रश्नावर थेट बोलली नसली तरी भविष्यात ती यावर काहीतरी बोलेल हे नक्की.

शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांच्या रिलेशनपवरही खूपच चर्चा झाली होती. पण नंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

वीणाने जेव्हा सोशल मीडियावरून शिवला पाठिंबा दिला होता तेव्हा अनेकांनी ते परत एकत्र येतील असा अंदाज बांधला होता. तसेच अनेकदा वीणा शिव १६ वा सीझन जिंकावा यासाठीही प्रार्थना करताना दिसली होती.

वीणा आणि शिव बिग बॉस मराठी सीझन २ मध्ये एकत्र होते तेव्हाच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. बिग बॉसच्या या सिजनमध्ये दोघांच्या प्रेमाचीही मोठी चर्चा झाली होती. काही महिन्यांपूर्वी आपापसांतील मतभेदांमुळे हे जोडपे वेगळे झाले होते आता पुन्हा वीणा जगताप तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dattwadi Temple: 'प्रशासन चुकले, मामलेदारांविरोधात तक्रार करणार'! साखळीतील मूर्ती चोरी प्रकरणाला वेगळे वळण

Love Horoscope Today: रवि योग आणि नीचभंग राजयोगाचा 'या' राशींच्या लव्ह लाईफवर होणार परिणाम!

Taxi Aggregator: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर'बाबत फेरविचार करावा! पायलट संघटनेची मागणी; पारंपरिक व्यावसायिकांना फटका बसण्याची भीती

Yuri Alemao: 'राज्य सरकार बहुजनविरोधी, 2027 निवडणुकीत भाजपचा होणार दारूण पराभव'; LOP आलेमाव यांचा घणाघात

Shirgao: बळीराजा संकटात! शिरगावात भातशेती पाण्याखाली; पावसाच्या तडाख्याने रोपे मातीमोल

SCROLL FOR NEXT