Bhediya Trailer Dainik Gomantak
मनोरंजन

Bhediya Trailer: वरुण धवनचा हॉरर-कॉमेडी ने भरलेला 'Bhediya' चा ट्रेलर आउट

Bhediya Trailer Out Now: बॉलिवूड सुपरस्टार वरुण धवनचा मोस्ट अवेटेड 'भेडिया' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचा दमदार कलाकार वरुण धवनचा बहुचर्चित चित्रपट 'भेडिया' (Bhediya) चा ट्रेलर रिलीज झाला आहे. भेडियाचा हा खतरनाक ट्रेलर पाहिल्यानंतर तुमच्या आंगावर काटा नक्कीच उभा राहिल. या चित्रपटाच्या ट्रेलरवरून, भेडिया हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असणार आहे, याचा सहज अंदाज लावता येतो. 'भेडिया' चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांची उत्कंठा अधिक वाढली आहे. 

  • भेडियाचा दमदार ट्रेलर रिलीज

वरुण धवन (Varun Dhawan) आणि क्रिती सेनन स्टारर भेडियाचा ट्रेलर बुधवारी जिओ स्टुडिओ यूट्यूब चॅनलवर रिलीज झाला आहे. या चित्रपटात (Movie) वरुण एका इच्छाधारी भेडियाची भूमिका साकारत असल्याचे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. जंगलात भेडिया चावल्यानंतर वरुणला संसर्ग होतो आणि नंतर तो स्वतः भेडिया बनून दहशत पसरवतो. क्रिती या चित्रपटात डॉक्टर कनिकाची भूमिका साकारत असून, संसर्ग झालेल्या वरुणला बरा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी अभिषेक बॅनर्जी आणि दीपक डोबरियाल या अभिनेत्यांची झलक पाहायला मिळणार आहे. 2 मिनिटे 55 सेकंदांच्या या ट्रेलरवरून हे निश्चित केले जाऊ शकते की दिग्दर्शक अमर कौशिकचा हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी असणार आहे.

  • चाहत्यांच्या कमेंटस्

    याआधी अमर कौशिक आणि निर्माते दिनेश विजान यांच्या जोडीने 'स्त्री' सारखा जबरदस्त हॉरर कॉमेडी चित्रपट बनवला आहे. हाच क्रम पुढे नेत दोघांनी आता भेडिया आणला आहे. सोशल मीडियावर (Social Media) भेडियाचा ट्रेलर पाहून लोक त्याला उत्तम सांगत आहेत. एका युजरने ट्विट करून लिहिले की - याची अपेक्षा नव्हती पण चित्रपटाचा ट्रेलर वाखाणण्याजोगा आहे. दुसऱ्या वापरकर्त्याचा असा विश्वास आहे की ट्रेलरसह व्हीएफएक्स आणि पार्श्वभूमी सुपर आहे. वरुद्ध धवन आणि क्रिती सेनॉनचा 'भेडिया' पुढील महिन्यात 25 नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. वरुण धवनला या चित्रपटाकडून खूप आशा आहेत, कारण याआधी रिलीज झालेला वरुण धवनचा 'जुग जुग' हा सरासरी चित्रपट ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 4th T20: 'तीन पोती गहू विकून आलो होतो...', भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्याने चाहत्याचा टाहो; BCCI वर टीकेची झोड

Viral Video: ब्रेकअप झालं अन् तिनं चक्क Chat GPT सोबत केलं लग्न; AI पार्टनरच्या प्रेमात बुडाली जपानी तरुणी Watch

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

SCROLL FOR NEXT