Vaibhavi Upadhyay Passes Away Dainik Gomantak
मनोरंजन

Vaibhavi Upadhyay Passes Away : 'साराभाई व्हर्सेस साराभाई'च्या जास्मिनने घेतला जगाचा निरोप...अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा अपघाती मृत्यू

'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा अपघाती मृत्यू झाला आहे

Rahul sadolikar

दोनच दिवसांपूर्वी बंगाली अभिनेत्री सुचंद्राच्या अपघाती मृ्त्यूची बातमी समोर आली होती आणि आज पुन्हा एक दुखद बातमी समोर आली आहे. 'साराभाई व्हर्सेस साराभाई'मध्ये जस्मिनची भूमिका साकारणाऱ्या वैभवी उपाध्यायचे कार अपघातात निधन झाले. 

हिमाचल प्रदेशमध्ये सोमवारी म्हणजेच २२ मे रोजी हा भीषण अपघात घडला. चंदिगडमध्ये राहणारे त्यांचे कुटुंबीय पार्थिव घेऊन मुंबईत पोहोचले असून, बुधवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. निर्माता आणि अभिनेता जेडी मजेठिया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

वैभवी अपघात अन् मृत्यू

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव वैभवी उपाध्याय यांचे कार अपघातात निधन झाले. ती 'सीआयडी' आणि 'अदालत' सारख्या अनेक शोचा भाग होती.पण तिची ओळख 'साराभाई व्हर्सेस साराभाई' साठी जास्त आहे. 

या शोमध्ये तिने जस्मिनची भूमिका साकारली होती. वैभवीच्या मृत्यूची बातमी समजताच इंडस्ट्रीत शोककळा पसरली. 'साराभाई व्हर्सेस साराभाई'मध्ये एकत्र काम केलेली अभिनेत्री रुपाली गांगुली हिनेही सोशल मीडियावर ही बातमी ऐकून दु:ख व्यक्त केले आहे. त्याने वैभवीचा फोटो शेअर केला आणि लिहिले - तू लवकरच निघून गेलीस.

जेडी मजेठिया म्हणाले - विश्वास बसत नाही

निर्माता-अभिनेता जेडी मजेठिया म्हणाले, 'मला धक्का बसला आहे. ती खूप चांगल्या हृदयाची एक हुशार अभिनेत्री होती, तिला तिचे योग्य स्थान मिळाले नाही .

ते म्हणाले, 'नक्की सांगता येत नाही, आयुष्याविषयी आधीच काही सांगता येत नाही. एक अद्भुत अभिनेत्री आणि प्रिय मित्र, वैभवी आजही साराभाई व्हर्सेस साराभाई मधील जस्मिनच्या भूमिकेसाठी लक्षात आहे.

भावी जोडीदारही कारमध्ये होता

त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दल बोलताना जेडी मजेठिया म्हणाले, 'चंदीगडजवळ त्यांचा अपघात झाला आणि कुटुंब त्यांचे पार्थिव घेऊन मुंबईत पोहोचले आहे, तिथेच त्यांचे अंतिम संस्कार केले जातील. रस्त्यावर वळण घेत असताना कार खड्ड्यात घसरली तेव्हा ती तिच्या भावी जोडीदारही सोबत कारमध्ये होती. ही बातमी समजताच त्याचा भाऊ चंदीगडला रवाना झाला.

देवेन भोजानी यांचे ट्विट

अभिनेते देवेन भोजानी यांनीही ट्विट केले आणि लिहिले, 'धक्कादायक, खूप चांगली अभिनेत्री आणि एक चांगली मैत्रीण साराभाई vs साराभाईची जास्मिन म्हणून ओळखली जाणारी वैभवी उपाध्याय आता आमच्यात नाही. काही तासांपूर्वी तिचा अपघात झाला. वैभवीच्या आत्म्याला शांती लाभो.

दोनच दिवसांपूर्वी अभिनेत्री सुचंद्राचा अपघाती मृत्यू

सुचंद्र दासगुप्ता शनिवारी रात्री शूटिंगवरून घरी परतत होती. घरी येण्यासाठी तिने ड्रायव्हिंग अॅपवरून बाईक बुक केली होती, अचानक तिच्या बाईकसमोर एक सायकलस्वार आला, नंतर ड्रायव्हरने ब्रेक दाबला.

 मग अभिनेत्रीने उडी मारली आणि पडली, त्यानंतर तिथून जाणाऱ्या लॉरीने तिला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सुचंद्र दासगुप्ताला जीव गमवावा लागला. दोनच दिवसांच्या अंतराने वैभवीचा अपघात झाल्याने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT