उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर स्टारर "सम्राट पृथ्वीराज" हा चित्रपट त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर योगींनी बोलताना सांगितले की, हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री असेल. या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग यूपीमधील लोक भवन येथे करण्यात आले असून चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी अक्षय कुमार, मानुषी छिल्लर आणि दिग्दर्शक चंद्र प्रकाश द्विवेदी उपस्थित होते. (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath has made Samrat Prithviraj movie tax free in Uttar Pradesh)
दरम्यान, शुक्रवारी, राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कानपूरला भेट देत आहेत. तयारीचा आढावा घेण्यासाठी कानपूरमध्ये असल्याने योगींना चित्रपट पाहण्यास उशीर झाला.
दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पत्नी सोनल आणि मुलगा जय शहा यांच्यासह बुधवारी दिल्लीत 'सम्राट पृथ्वीराज'च्या स्पेशल स्क्रीनिंगला उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी पीरियड ड्रामाच्या कलाकारांचे आणि क्रूचे कौतुक केले.
अमित शहा म्हणाले की, ''इतिहासाचा विद्यार्थी म्हणून, भारताच्या सांस्कृतिक युद्धांचे चित्रण करणारा चित्रपट पाहण्यात मला आनंद तर आलाच, पण या सिनेमात भारतीयांचे चित्रण ज्या प्रकारे केले गेले ते पाहूनही मी हरखून गेलो. 13 वर्षांनंतर मी कुटुंबासह थिएटरमध्ये चित्रपट पाहत आहे. त्याच्या कुटुंबीयांसाठी तो खूप आनंदाचा क्षण होता.''
अमित शाह पुढे म्हणाले की, ''हा चित्रपट खरोखरच महिलांचा आदर आणि सशक्तीकरण करण्याची भारतीय संस्कृती दर्शवतो. मध्ययुगीन काळात स्त्रियांना मिळालेल्या राजकीय शक्ती आणि निवडीचे स्वातंत्र्य याबद्दल चित्रपटाने एक अतिशय मजबूत संदेश दिला.''
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.