Urfi Javed Dainik Gomantak
मनोरंजन

Urfi Javed: उर्फी जावेदने शिवीगाळ करणाऱ्या तरुणांची केली कानउघडणी

Urfi Javed: गेल्या काही दिवसांत उर्फीला फोनवरून शिवीगाळ होत होती.

दैनिक गोमन्तक

उर्फी जावेद आपल्या हटके फॅशन आणि विचित्र कपड्यामुळे नेहमीच सोसल मिडियावर चर्चेत असते. तिने शेअर केलेल्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात. पण उर्फी जावेद आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतेच उर्फी जावेदने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. यात तिने शिवीगाळ करणाऱ्या मुलांची नाव आणि फोटो रिव्हील केले आहेत. गेल्या काही दिवसांत उर्फीला सतत फोनवरून शिवीगाळ होत होत्या. त्यामुळे शिवीगाळ करणाऱ्या तरुणांची उर्फी जावेदने चांगलीच कानउघडणी केली आहे.

उर्फी जावेद सोशल मीडियावर (Social Media) कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे ट्रोल होताना दिसत असते. तिच्या कपड्यांवरून नेटकरीच नव्हे, तर अनेक कलाकार देखील तिच्यावर टीका करताना दिसतात. सगळ्यांनाच उर्फीने सडेतोड उत्तरं दिली आणि गप्प केलं. पण, आता गेल्या काही दिवसांपासून उर्फीला फोनवर शिवीगाळ करणाऱ्या तरुणांना खडे बोल बजावले आहे.

उर्फीने सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यात तिने लिहिले की, ‘हा मुलगा आणि याचे मित्र मला सतत कॉल करून त्रास देत आहेत. यांना माझा नंबर कसा मिळाला याबद्दल काही माहिती नाही. आजकालच्या या मुलांना काय झाले आहे काही कळत नाही. ते सतत मला कॉल करून का त्रास देत आहेत? मी या मुलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार आहे. जर, तुमच्यापैकी कुणीही या मुलांना ओळखत असेल, तर त्यांच्या पालकांचा नंबर मला द्यावा.’

उर्फी जावेदने या मुलांच्या पालकांच्या संपर्क क्रमांक देणाऱ्या व्यक्तीला इनाम देण्याचे देखील जाहीर केले आहे. उर्फीने शेअर केलेले हे स्टोरीमधील स्क्रीनशॉट या मुलांनी पुन्हा शेअर केल्याने उर्फीचा पार आणखी वाढला आहे.

यावर संतापलेल्या उर्फीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘पुढची पिढी बरबादीकडे जाताना दिसतेय. आता हा मुलगा माझ्या स्टोरीचा स्क्रीनशॉट अभिमानाने रीशेअर करत आहे. ज्या गोष्टीची लाज वाटावी आणि माफी मागावी, त्या गोष्टी ही मूले मिरवत आहेत. यांना झाले तरी काय?’ उर्फीने आपल्या भाषेत जरी समज दिली असली, तरी आता ती या मुलांविरोधात कायदेशीर तक्रार करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Fish Market: 'म्हापसेकरांना आणखी संकटात लोटू नये'! म्हापसा पालिकेला मासळी मार्केट अस्वच्छतेवर नोटीस; काँग्रेस करणार स्वच्छता

Shelvan Jetty: '..गावात जेटी होऊ देणार नाही'! शेळवण-कुडचडेवासीयांचा निर्धार; आमदार काब्राल यांची घेतली भेट

Viral Video: डोळ्यांची फसवणूक करणारा भारतीय जुगाड तूफान व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटकरीही अवाक; म्हणाले, 'गजब इंदूर नाही, तर गजब टाटा...'

Kavyashree Kurse: '..बादल पे पाँव है'! काले येथील काव्यश्री कुर्सेने घेतली आकाशझेप; 21व्या वर्षी बनली व्यावसायिक पायलट

1 नाही, 2 नाही 40 कोटींची खोटी बिले! 8 कोटीचा GST घोटाळा; गोव्याच्या व्यापाऱ्याला कोल्हापूर गुप्तचर यंत्रणेच्या पथकाकडून अटक

SCROLL FOR NEXT