Krishna Mukherjee and Chirag Batliwala Wedding Dainik Gomantak
मनोरंजन

Krishna Chirag: मांडवीवरील सूर्यास्त आणि आयुष्याची नवी सुरूवात; एक बंगाली एक पारशी गोव्यात झाले एकरूप

अभिनेत्री कृष्णा मुखर्जी तिच्या लग्नामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती.

Pramod Yadav

Krishna Mukherjee and Chirag Batliwala Wedding: स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका 'ये है मोहब्बतें'ने घराघरात नाव पोहोचलेली कृष्णा मुखर्जीने तिचा प्रियकर चिराग बाटलीवालासोबत लग्नगाठ बांधली आहे. गोव्यातील बंगाली रीतिरिवाजांनी दोघांनी एकमेकांनी सात जन्माची शपथ घेतली.

कृष्णा मुखर्जी आणि चिराग यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत.

(TV actress Krishna Mukherjee gets married to Chirag Batliwala In Goa)

अभिनेत्री कृष्णा मुखर्जी तिच्या लग्नामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती. अनेक चाहते तिच्या लग्नाची वाट पाहत होते. 13 मार्च रोजी कृष्णाने अखेर गोव्यात चिराग बाटलीवाला याच्याशी लग्न केले. या जोडप्याने समुद्र किनाऱ्यावर काढलेले अनेक फोटो शेअर केले आहेत.

बंगाली रितीरिवाजानुसार लग्नासाठी हे जोडपे लाल आणि पांढऱ्या रंगाच्या पोशाख घातला होता. कृष्णाने मुकुटसह पांढरा आणि लाल रंगाचा लेहेंगा घातला होता, तर चिरागने टोपोर घातला होता. सुपारीच्या पानाने चेहरा झाकून कृष्णाने मंडपात प्रवेश केला.

कृष्णा मुखर्जीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही पारंपारिक बंगाली कपड्यांमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. फोटो शेअर करत कृष्णाने लिहिले की, "आणि एका बंगाली मुलीने पारशी मुलासोबत आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली आहे. या खास दिवशी आम्ही तुमचे प्रेम आणि आशीर्वाद हवे आहेत."

कृष्णा मुखर्जी तिचा प्रियकर चिराग बाटलीवाला यांचा मांडवी नदीतील फोटोशुट देखील खूप अनोखा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. यात कृष्णा आणि चिराग एकमेकांना किस करताना दिसत असून, मागे अटल सेतू आणि सूर्यास्त दिसत आहे. चिरागच्या उघड्या शरीरावर 'विल यु मॅरी मी, एस , नो' असे लिहल्याले स्पष्ट दिसत आहे. त्यात एस वरती टीकमार्क करण्यात आले आहे.

चिरागने कृष्णा मुखर्जीला प्रपोज केल्याचे फोटो देखील दोघांनी आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. मांडवी नदीतील याचवरती चिरागने कृष्णा प्रपोज केला आहे. सध्या दोघांचे गोवा डेस्टिनेशन वेडिंग चंदेरी दुनियेत चर्चेचा विषय ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

Mhadei Sanctuary Issue: सीमा ठरवणार, वस्ती हलवणार? म्हादई अभयारण्यात वस्तीला परवानगी नाही, व्याघ्र प्रकल्पाचा पर्याय हुकल्याने गोंधळ; क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्टच सांगितलं

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

SCROLL FOR NEXT