Tunisha Sharma Dainik Gomantak
मनोरंजन

Tunisha Sharma Suicide case: शीजान अजुन अडकणार? तुनिषाचा फोन पोलिसांकडुन अनलॉक..

तुनिषा शर्माचा फोन पोलिसांकडुन अनलॉक झाल्याने आता नव्या गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी आता नवे खुलासे समोर येणार आहेत ;कारण तुनिषाचा फोन पोलिसांकडुन अनलॉक झाला आहे. आता या फोनमधुन नव्या गोष्टी समोर येऊन या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 24 डिसेंबर रोजी तुनिषाने मालिकेच्या सेटवरच मेक-अप रूममध्ये तिने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी व्यक्त केलेल्या संशयावरुन तुनिषाचा सहकलाकार अभिनेता शीजान खान याला पोलिसांनी अटक केली होती. आता तुनिषाचा फोन अनलॉक झाल्याने काही गोष्टा नव्याने समोर येण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात तुनिषाच्या मोलकरणीकडे सुद्धा चौकशी केली. मोलकरणीने सांगितले की ,तुनिषा आणि शीजान यांची लग्नाची तयारी सुरू होती. शीजान आणि तुनिषा एकमेकांच्या घरीही राहायला जायचे. पुढे सांगताना तुनिषाच्या घरची मोलकरीण म्हणाली की तुनिषाची आई वनिता शर्मा यांचेही शीजानच्या घरी येणे -जाणे होते.

अभिनेत्री तुनिषाचा फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न पोलिस गेले काही दिवस करत होते. 29 डिसेंबरच्या दिवशी त्यांना यश आले. या फोनमधुन काही धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. तुनिषाच्या आईने शीजान खान ड्रग्ज घेत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस आता याबाबतीत आधिक तपास करत आहेत या प्रकरणात अजुन धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

Ponda Water Problems: फोंड्यात 15 दिवसांत पुरेसे पाणी मिळणार? जनता दरबारात सुभाष शिरोडकरांचा शब्द

Gold Mine Accident: "मदतीसाठी आक्रोश अन् चिखलाने माखलेले मृतदेह!" सोन्याची खाण ठरली मृत्यूचा सापळा; 30 जणांचा मृत्यू

Mandovi River Pollution: मांडवी नदी प्रदूषणावर हायकोर्टात सुनावणी; खाडी परिसरातील प्रत्येक आस्थापनाची तपासणी करण्याची सूचना

Goa Crime: कला अकादमी कंत्राटदाराची आत्महत्या; 45 लाखांच्या थकबाकीवरून कंपनीच्या दोघांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT