Brahmastra Trailer Dainik Gomantak
मनोरंजन

आलिया-रणबीरची लव्ह स्टोरी दाखवणारा 'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर रिलीज

'ब्रह्मास्त्र' हिंदीसोबतच तमिळ, तेलगु आणि मल्याळम भाषेतही होतोय प्रदर्शित

दैनिक गोमन्तक

अनेक दिग्गज सिनेकलाकारांचा सहभाग असलेल्या आणि गेल्या चार वर्षांपासून बनत असलेल्या 'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर आज सिनेरसिकांच्या भेटीला येतो आहे. विशेष म्हणजे अनेक मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी चित्रपटांचे ट्रेलर मोठ्या कार्यक्रमात विशेष नियोजन करत प्रदर्शित होतील याची काळजी घेतली जाते. मात्र 'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर याला अपवाद ठरला आहे. कारण कोणता ही गाजावाजा न करता ही या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतो आहे. (Trailer release of 'Brahmastra' showing Alia-Ranbir's love story )

'ब्रह्मास्त्र'चे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी याबाबत विशेष नियोजन न करताना रिलीज केला आहे. याच प्रदर्शन हे यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करण्यात आले. मात्र निर्मात्यांनी मुंबईत पत्रकारांना स्वतंत्रपणे आमंत्रण देत हा ट्रेलर दाखवला आणि त्यांचा अभिप्राय काय आहे. याबद्दल ही चर्चा केली. ज्यामध्ये जवळपास सर्वांनी हा ट्रेलर खूप चांगला असल्याचं सांगितले आहे. आणि विशेष म्हणजे सोशल मीडियावर ट्रेलर रिलीज झाल्यानंतर, सिनेरसिकांनी ही यावर आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

'ब्रह्मास्त्र' का उतरतोय प्रेक्षकांच्या पसंतीला

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतीये

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या जवळ आले. आणि हेच दोघे पुढे जाऊन लग्नबंधनात अडकले आहेत. हे दोघे पहिल्यांदाच एका चित्रपटात पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे त्याचे चाहते उत्सुक आहेत. दोघांची प्रेमकथा ब्रह्मास्त्रच्या मेन ट्रॅकमध्ये आहे. ट्रेलरमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी चांगलीच दिसत आहे.

अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजाची जोड

या चित्रपटात सनातन संस्कृतीची कथा असल्याचे ट्रेलरमध्ये स्पष्ट होते आहे. आणि बीग बी अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजाची जोड यात समाविष्ट असल्याने याला आणखी उठावदारपणा आला आहे. यात सर्व शस्त्रांची देवता ब्रह्मास्त्राची ही कथा आहे. अशा गोष्टी सनातन संस्कृतीत ठिकठिकाणी विखुरलेल्या आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना त्या गोष्टींशी जोडतो.

VFXची हॉलिवूडच्या मार्वल फिल्म्सशी स्पर्धा

अॅक्शन अॅक्शन सीन्स आणि याला मिळालेली व्हीएफएक्सची जोड याने ट्रेलरची उंची वाढवली.यात असा कोणताही सीन नाही. ज्यामध्ये VFX अप्रतिम नाही. विशेषतः अॅक्शन सीन्स, ते व्हीएफएक्सने वाढवले ​​आहेत. हा चित्रपट हॉलिवूडच्या मार्वल फिल्म्सच्या व्हीएफएक्सशी स्पर्धा करेल असे दिसते.

नागार्जुनच्या सहभागाने चाहत्यांची उत्सुकता शिगेला

हिंदीसोबतच हा चित्रपट तमिळ, तेलुगु आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होत आहे. ब्रह्मास्त्रमध्ये संपूर्ण भारतातील चित्रपट बनण्याची क्षमता आहे.यातच या चित्रपटात नागार्जुनची उपस्थिती दक्षिणेतील त्याच्या चाहत्यांसाठी खास बनवत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

France Protest: नेपाळनंतर फ्रान्समध्ये 'अराजक'! नवा पंतप्रधान निवडताच उसळला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड सुरु; 200 आंदोलकांना अटक VIDEO

"माझे आजोबा पंतप्रधान...", प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची Post Viral; नेपाळच्या राजकारणाशी नेमका संबंध काय?

Goa Assembly Speaker Election: सभापतीपदाच्या खूर्चीवर कोण बसणार? विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात

Goa Cabinet: दिवाडीतील सप्तकोटेश्वर मंदिराचा चेहरामोहरा बदलणार; 'कोटी तीर्थ कॉरिडॉर'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

Goa Taxi Issue: 'विश्वास ठेवला अन् सरकारनं फसवलं'; टॅक्सी व्यावसायिकांची मंत्रालयाबाहेर गर्दी, सीएमनी दिला Busy असल्याचा मेसेज

SCROLL FOR NEXT