Toxic movie release Date Dainik Gomantak
मनोरंजन

Toxic Movie Postponed: 'रॉकीभाई'च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! बहुचर्चित 'टॉक्सिक' सिनेमाचे प्रदर्शन लांबणीवर; 'हे' कारण आले समोर

Toxic Movie Release Date: निर्मात्यांनी सामाजिक माध्यमांवर निवेदन प्रसिद्ध करत हा निर्णय स्पष्ट केला. त्यांच्या मते ‘टॉक्सिक’ हा केवळ प्रादेशिक नव्हे तर जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.

Sameer Panditrao

रंगपंचमीच्या उत्साहात चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टॉक्सिक : अ फेरी टेल फॉर ग्रोन-अप्स’च्या प्रदर्शनाबाबत निर्मात्यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. प्रमुख भूमिकेत यश झळकणार असलेला हा चित्रपट पूर्वी १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले असून नवी तारीख ४ जून २०२६ जाहीर करण्यात आली आहे.

निर्मात्यांनी सामाजिक माध्यमांवर निवेदन प्रसिद्ध करत हा निर्णय स्पष्ट केला. त्यांच्या मते ‘टॉक्सिक’ हा केवळ प्रादेशिक नव्हे तर जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. चित्रपटाचे चित्रीकरण कन्नड आणि इंग्रजी या दोन भाषांत करण्यात आले असून भारतासह आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मात्र काही प्रदेशांतील अनिश्चित परिस्थिती, विशेषत: मध्यपूर्वेतील घडामोडी, यामुळे व्यापक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे सर्व भागीदार आणि प्रेक्षकांचा विचार करून प्रदर्शन पुढे ढकलण्याचा “कठीण पण विचारपूर्वक” निर्णय घेतल्याचे निर्मात्यांनी नमूद केले. या चित्रपटात यश पूर्णपणे नव्या रूपात दिसणार आहे.

त्याच्यासोबत अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. दिग्दर्शनाची धुरा गीतू मोहनदास यांनी सांभाळली असून कथालेखनातही यशचा सहभाग आहे. कन्नड व इंग्रजीबरोबरच हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्येही डब केलेल्या आवृत्त्या प्रदर्शित होणार आहेत.

दरम्यान, १९ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘धुरंधर २’ या चित्रपटाशी ‘टॉक्सिक’ची टक्कर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.मात्र ‘टॉक्सिक’ पुढे ढकलल्याने ही स्पर्धा टळली आहे. निर्मात्यांनी चाहत्यांचे आभार मानत त्यांच्या संयमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ४ जून २०२६ रोजी हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून, चाहत्यांची उत्सुकता आता त्या दिवसाकडे लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय सौझांच्या दुर्मिळ कलाकृतीनं रचला जागतिक विक्रम; 1965 मध्ये साकारलेल्या 'हनुमान– द मंकी गॉड' चित्राला 15.60 कोटींची बोली

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालचा मुक्काम कारागृहातच! सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, अंतरिम जामिनाची फेटाळली मागणी

Cabinet Decisions: उज्ज्वला योजनेपासून 'संजीवनी' साखर कारखान्यापर्यंत; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय, CM सावंतांची माहिती

Military Plane Crash: लँडिंग स्ट्रिप नसताना पत्करला इमर्जन्सी लँडिंगचा धोका; भीषण विमान अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू VIDEO

Goa Water Storage: धरणे तुडुंब; साळावली-आमठाणे शंभर टक्के, बहुतांश धरणांत 90 टक्क्यांहून अधिक साठा; चापोलीत केवळ 74 टक्के

SCROLL FOR NEXT