Cannes Film Festival Dainik Gomantak
मनोरंजन

'आमच्यावर बलात्कार करणे थांबवा'! Cannes च्या रेड कार्पेटवर महिलेचा युक्रेन निषेध

75 व्या कान फिल्म फेस्टिवलमध्ये महिलेने उठवला आवाज.

दैनिक गोमन्तक

75 व्या कान फिल्म फेस्टिवलच्या (Cannes Film Festival) रेड कार्पेटवर एक विचित्र घटना घडली आहे. युक्रेनमध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचारावर एका महिलेने कानच्या रेड कार्पेटवर हक्कासाठी आवाज उठवला. (Topless woman on the red carpet in Cannes Film Festival protests Ukraine)

ती महिला रेड कार्पेटवर आली आणि अचानक कपडे काढू लागली. त्या महिलेच्या शरीरावर युक्रेनियन ध्वजाच्या निळ्या आणि पिवळ्या रंगात "Stop rapping us" असे लिहीले होते. तसेच, संपूर्ण शरीरावर रक्तासारखे ठिपके देखील होते, जे बनावट असल्याचे दिसून आले. महिलेच्या पाठीच्या खालच्या बाजूला 'स्कम' असे देखील लिहिण्यात आले होते.

कान अधिकाऱ्यांनी 'त्या' महिलेला त्यांच्या कोटने झाकले

अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टर काइल बुकाननने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने लिहिले आहे की, "जॉर्ज मिलरच्या आगामी चित्रपटासाठी कान्सच्या रेड कार्पेटवर ती युक्रेनियन महिला आली होती. रेड कार्पेटवर येऊन त्या महिलेने तिचे सर्व कपडे काढले, आणि तिच्या अंगभर काही ना काही तरी लिहीलेले होते. किंचाळत ती खाली गुडघ्यावर बसली. घटनास्थळी कानच्या अधिकाऱ्यांनी तिचे उघडे शरीर त्यांच्या कोटने झाकण्याचा प्रयत्न केला.

युक्रेनमध्ये शेकडो महिला आणि मुलींवर बलात्कार झाले

या वर्षी 24 फेब्रुवारी रोजी रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला केला आणि हे युद्ध आजही सुरूच आहे. दरम्यान, अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की रशियन सैनिक त्यांच्या ताब्यात असलेल्या युक्रेनियन महिला आणि मुलींवर सातत्याने बलात्कार करत आहेत.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, जे लोक या प्रकरणाचा तपास करत आहेत त्यांना देखील अटक केली जाणार आहे. शेकडो युक्रेनियन महिला आणि मुलींवर बलात्कार झाल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत. तसेच लहान मुलींवरही लैंगिक अत्याचार करण्यात आले आहे. मंगळवारी कान फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान झेलेन्स्की यांनी एका व्हिडिओद्वारे देशांना मदतीचे आवाहन केले आहे.

युक्रेनमध्ये मारल्या गेलेल्या दिग्दर्शकाची डॉक्यूमेंट्री दाखवली

रशिया-युक्रेन वादाचे (Russia Ukraine War) पडसाद जगभर चर्चा असलेल्या कान फेस्टिवल मध्येही पडले आहेत. गुरूवारी "Mariupolis 2" या डॉक्यूमेंट्रीचे विशेष स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्याचे दिग्दर्शन Mantas Kvedaravicius यांनी केले आहे, जो गेल्या महिन्यात रशियन सैन्याने युक्रेनमध्ये मारला आहे. शनिवारी देखील युक्रेनच्या समस्याग्रस्त भागातील काही निर्मात्यांचे चित्रपट दाखवले जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT