Katrina Kaif and Salman Khan's Movie Dainik Gomantak
मनोरंजन

Tiger 3: दिवाळीत सलमानचा चित्रपट इतिहास रचणार! थिएटरमध्ये येण्याआधीच...

Tiger 3: त्यानुसार मनीष शर्मा दिग्दर्शित चित्रपटाने रिलीजपूर्वीच 8 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

दैनिक गोमन्तक

Tiger 3: बॉलीवूडचे कलाकार नेहमीत चर्चेत असतात. आता चाहत्यांचा भाईजान म्हणजेच सलमान खान आता पुन्हा एकदा चर्चांचा भाग झाला आहे. सलमान खानचा टायगर ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहात येणार आहे. मात्र त्याआधीच या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर आपले वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आहे.

या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरु झाले असून यामधून रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 'टायगर 3'चे अॅडव्हान्स बुकिंग 5 नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. काही तासांतच तिकीटांची फास्ट सेलिंग मोडवर विक्री सुरू झाली. आत्तापर्यंत, तीन दिवसांत चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगने 8 कोटींचा आकडा पार केला आहे. 2 लाख 88 हजार 515 तिकिटे बुक झाली आहेत. त्यानुसार मनीष शर्मा दिग्दर्शित चित्रपटाने रिलीजपूर्वीच 8 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

महत्वाचे म्हणजे, दिवाळीच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित झाल्याचे आजपर्यंत कधीच घडले नाही. चित्रपट एक दिवस पुढे किंवा एक दिवस मागे नक्कीच प्रदर्शित झाले आहेत. पण 'टायगर 3' 12 नोव्हेंबर 2023 रोजी म्हणजेच दिवाळीच्या दिवशीच प्रदर्शित होणार आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, टायगरची ३ हा चित्रपट पाहण्यासाठी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल ते दिल्लीपर्यंत जोरदार प्रतिसाद मिळत आहे. 'टायगर 3' ने या तीन राज्यांमध्ये 1 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाने गुजरात, कर्नाटक, तेलंगणा ते यूपीपर्यंत 50 लाखांहून अधिक रुपयांचा व्यवसाय केला आहे.

दिवाळीत मोडणार विक्रम

आत्तापर्यंत 'टायगर 3' दिवाळीला रिलीज झालेल्या चित्रपटांचे रेकॉर्ड सहज मोडताना दिसत आहे. गेल्या 23 वर्षांत दिवाळीला प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये 'क्रिश 3', 'गोलमाल 3', 'ए दिल है मुश्किल', 'रा.वन', 'जब तक है जान', 'ठग्स ऑफ हिंदूस्तान', 'हॅपी न्यू' यांचा समावेश आहे. वर्ष ', 'हाऊसफुल 4' ते 'सूर्यवंशी' सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT