थ्री इडियट हा आमिर खानचा सुपरहिट चित्रपट कोण विसरेल? या चित्रपटातील सगळी पात्रं 13 वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत.
या चित्रपटात लायब्ररियन दुबेची भूमीका साकारणाऱ्या अभिनेते अखिलेश मिश्रा यांचं निधन झाल्याची बातमी काही तासांपूर्वी समोर आली आहे.
बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा सुपरहिट चित्रपट 'थ्री इडियट्स'मध्ये लायब्रेरियन दुबेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अखिल मिश्रा यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. उंच इमारतीवरून पडून अभिनेत्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अखिल मिश्रा हे 58 वर्षांचे होते. त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अखिल मिश्रा हे हैदराबादमध्ये एका प्रोजेक्टचे शूटिंग करत होते. त्याचठिकाणी बाल्कनीमध्ये काही तरी काम करत असताना ते उंच इमारतीवरून खाली पडले. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
अखिल मिश्राच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली असून चाहत्यांना या बातमीवर विश्वास बसत नाहीये. अखिल मिश्रा यांच्या पश्चात त्याची पत्नी सुझान बर्नर्ट आहे. सुझान बर्नर्ट या जर्मन अभिनेत्री आहे.
अखिलने अखेरचा श्वास घेतला तेव्हा ती हैदराबादमध्येच होती. 'माझे हृदय तुटले आहे, माझा जीवनसाथी गेला आहे.', अशी प्रतिक्रिया सुझान यांनी दिली आहे.
रिपोर्टनुसार त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती पण डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत. त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र, तेव्हापासून त्याची पत्नी सुझान शॉकमध्ये आहे.
वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं तक, अखिल यांनी 3 फेब्रुवारी 2009 रोजी जर्मन अभिनेत्री सुझान बर्नर्टशी लग्न केले. नंतर त्यांनी 30 सप्टेंबर 2011 रोजी पारंपारिक समारंभात भारतीय पद्धतीने लग्न केले.
अखिल मिश्रा यांनी 1983 मध्ये पहिले लग्न मंजू मिश्रा सोबत केले, पण काही काळानंतर ते दोघेही 1997 मध्ये वेगळे झाले. यानंतर, अभिनेत्याने 2009 मध्ये जर्मन अभिनेत्री सुझान बर्नर्टशी लग्न केले .
सुझान बर्नर्ट एक उत्कृष्ट बॅले डान्सर आणि सौंदर्यात पारंगत आहे.
यासोबतच त्यांनी अनेक टीव्ही मालिका आणि हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे.