Akanksha Puri- Mika Singh Dainik Gomantak
मनोरंजन

Akanksha Puri: या तर केवळ अफवा! मिकाबरोबरच्या लग्नाबाबत आकांक्षा पुरीने उलघडली अनेक गुपिते

Akanksha Puri: इतर स्पर्धकांनी माझ्यापासून जपून राहिले पाहिजे, असेदेखील तिने म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Akanksha Puri: आकांक्षा पुरी गेल्या काही काळापासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. आता ती बीग बॉस शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या आधी ती मीका सिंह की वोटी या कार्यक्रमात दिसून आली होती. त्यावेळी मिका सिंहने तिला निवडले होते. सध्या या शोबाबत आणि मिका सिंहच्या रिलेशनबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.

एका मुलाखती दरम्यान, ती खरंच मिका सिंहबरोबर लग्न करणार आहे का का तिला मिका सिंहने आपली भावी पत्नी म्हणून निवडणे हे सगळे खोटे होते असा प्रश्न विचारला असता आकांक्षाने म्हटले आहे की, जेव्हा शोदरम्यान मिका सिंह मला निवडत होते तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, मी माझ्या मैत्रीणीला निवडत आहे.

जर भविष्यात आम्हाला मैत्रीच्या पुढे जायचे असेल तर आम्ही विचार करु. आजही मी आणि मिका सिंह चांगले मित्र आहोत आणि पुढेही राहू, त्यांच्याशी लग्न करण्याचा कोणताही विचार केला नव्हता. मी आज सिंगल आहे. मात्र लोकांना वाटते की मी रिलेशनशीपमध्ये आहे. त्यामुळे कोण अॅप्रोचदेखील करत नाही, अशी खंतदेखील तिने मांडली आहे.

याबरोबरच, गौहर खान नेहमीच माझी आवडती स्पर्धक राहिली आहे. गेल्या चार सीझनपासून माझे बीग बॉससोबत नाव जोडले जात होते. मात्र मी इतर शो करत असल्याने आता ही संधी मिळत आहे. बीग बॉसच्या शो दरम्यान मला कोणी योग्य व्यक्ती मिळाला तर मी नक्की विचार करेन असेही आकांक्षाने म्हटले आहे. याबरोबरच, इतर स्पर्धकांनी माझ्यापासून जपून राहिले पाहिजे, असेदेखील तिने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim: लोकांच्या जीवाशी खेळ! उड्डाण पुलाच्या कामामुळे चालकांना धोका, वास्कोत नियमांची ऐशीतैशी; सळ्यांची धोकादायक वाहतूक

Vijay Merchant Trophy 2025: गोव्याची एक डाव, 152 धावांनी हार! दुसऱ्याच दिवशी पराभव; सलग तिसऱ्यांदा हाराकिरी

Goa ZP Election: पंचायत मंत्री माविन गुदिन्होंनी बजावला मतदानाचा हक्क! म्हणाले, 'हा लोकशाहीचा उत्सव'

India T20 World Cup Squad: सूर्यकुमारसाठी हा 'वर्ल्डकप' शेवटचा? हरपलेल्या फॉर्ममुळे वाढले टेन्शन; गिलबाबतही प्रश्नचिन्ह

स्वातंत्र्यसैनिकांनी जो गोवा दिला, तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आमची जबाबदारी! CM सावंतांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT