This famous writer confirms the sequel of Rowdy Rathore

 

Dainik Gomantak

मनोरंजन

'राउडी राठौर'च्या सिक्वेलमध्ये अक्षयचा दिसणार राऊडी अंदाज?

2022 च्या अखेरीस हा चित्रपट फ्लोरवर येऊ शकतो

दैनिक गोमन्तक

2012 साली प्रदर्शित झालेल्या बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमारच्या 'राउडी राठौर' या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आता या चित्रपटाच्या सिक्वेलवर काम सुरू आहे. याच चित्रपटाच्या सह-निर्मात्या शबिना खान यांनी 2019 मध्ये राउडी राठौर 2 ची घोषणा केली होती. आता प्रसिद्ध लेखक केव्ही विजयेंद्र प्रसाद हे चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या सांगण्यावरून राऊडी राठौरच्या सिक्वेलच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत.

एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, केव्ही विजयेंद्र प्रसाद म्हणाले की, मी सध्या राऊडी राठौर 2 ची स्क्रिप्ट लिहित आहे. कारण भन्साळी साहेबांनी सिक्वेल लिहिण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला होता. मी लवकरच ही स्क्रिप्ट पूर्ण करणार आहे. तसेच तो म्हणाला की मला या चित्रपटाच्या दिग्दर्शकाबद्दल काही माहिती आहे.

2022 च्या अखेरीस हा चित्रपट फ्लोरवर येऊ शकतो

याच रिपोर्टमध्ये सूत्राच्या हवाल्याने असा दावा करण्यात आला आहे की, सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) पुन्हा एकदा पारोच्या भूमिकेत दिसणार आहे. तसंच या चित्रपटातील शिवा आणि पारोची मुख्य भूमिका सिक्वेलमध्ये दिसण्याची शक्यता आहे. या सिक्वलची कथा पूर्णपणे नवीन असेल. लवकरच चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण होईल. पुढील वर्षी 2022 च्या अखेरीस हा चित्रपट फ्लोरवर जाण्याची शक्यता आहे.

प्रभुदेवा दिग्दर्शित राऊडी राठौर हा चित्रपट विक्रमार्कुडू या हिट तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे, ज्याची पटकथा केवी विजयेंद्र यांनी लिहिली होती. 2012 च्या चित्रपटात अक्षय कुमारने (Akshay Kumar) डबल शिवा आणि IPS विक्रम सिंह राठौरची भूमिका साकारली होती. अॅक्शन आणि रोमान्सने भरलेल्या या चित्रपटात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री चांगलीच पसंतीस उतरली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT