Akshay Kumar Dainik Gomantak
मनोरंजन

Akshay Kumar : "या चुकांमुळे माझे चित्रपट पडतात" अक्षय कुमार आपल्या फ्लॉप चित्रपटांवर बोललाच

अभिनेता अक्षय कुमारचे सलग एकामागोमाग चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडत आहेत...

Rahul sadolikar

अक्षय कुमार एक चांगला अभिनेता आहे, सगळ्या कॅटेगिरीतले चित्रपट त्याने आतापर्यंत केले आहेत. तो एक उत्तम अॅक्शन हिरो आहेच ;पण त्याचबरोबर तो एक विनोदी अभिनेताही आहे, काही चित्रपटांमध्ये गंभीर भूमीका करून त्याने आपण अष्टपैलू अभिनेता असल्याचे सिद्ध केले आहे ;पण त्याचे गेले काही चित्रपट जोरात आपटत आहेत. सलग चित्रपट का पडत आहेत त्यावर आता अक्षय कुमार स्पष्टच बोलला आहे.

बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपटांमुळे अक्षय कुमारच्या करिअरवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. काहीजण त्यांना निवृत्तीचा सल्ला देत आहेत तर काहीजण त्यांच्या क्रिएटिव्हीटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अशा परिस्थितीत सततच्या फ्लॉप चित्रपटांवर बिनधास्त अक्षय कुमारने उत्तर दिले आहे. फ्लॉप चित्रपटांची जबाबदारी त्याने स्वत: घेतली आहे. 

नुकताच अक्षय कुमारचा अभिनेता इमरान हाश्मीसोबतचा सेल्फी रिलीज झाला. या चित्रपटाला पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सुस्त ओपनिंगही मिळाली. त्यानंतर कंगना राणौतनेही आपल्या चित्रपटाला फ्लॉप म्हटले होते.

'आज तक' सोबतच्या संभाषणात, सलग तीन-चार फ्लॉप चित्रपटांबद्दल बोलताना अक्षय कुमार म्हणाला - माझ्यासोबत हे पहिल्यांदाच घडत नाहीये. माझ्या करिअरमध्ये मी याआधी 16 फ्लॉप चित्रपट दिले आहेत. एक काळ असाही होता की माझे 8 चित्रपट परत एकदा फ्लॉप झाले. 

आता माझ्याकडे ३-४ चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले आहेत. या सगळ्यामागे माझी चूक आहे. चित्रपट न चालणे ही सर्वस्वी माझी चूक आहे. आता प्रेक्षक बदलले आहेत. त्यामुळे तुम्हालाही बदलावे लागेल जर त्यांच्या गरजा बदलल्या असतील तर तुम्हालाही त्यानुसार काम करावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT