These Bollywood movies were shoot in Afghanistan  Dainik Gomantak
मनोरंजन

अफगाणिस्तानमध्ये झाले 'या' बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतले आहे. याबाबत बॉलिवूड (Bollywood) कलाकार आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

दैनिक गोमन्तक

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतले आहे. याबाबत बॉलिवूड (Bollywood) कलाकार आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. स्वरा भास्कर, जावेद अख्तर, राम गोपाल वर्मा, सिद्धार्थ आणि ओनीर सारख्या कलाकारांनी ट्विटरवर आपले मत व्यक्त केले आहे. पण काही बॉलिवूड चित्रपट आहेत ज्यांचे चित्रीकरण अफगाणिस्तानमध्ये झाले आहे. जर आपण कोणत्याही नवीनतम चित्रपटाबद्दल बोललो तर तो संजय दत्तचा चित्रपट 'तोरबाज' होता ज्याचे शूटिंग अफगाणिस्तानमध्ये झाले. अफगाणिस्तानमध्ये चित्रित झालेल्या चित्रपटांवर एक नजर टाकूया.

धर्मात्मा (1975)

या चित्रपटात फिरोज खान, हेमा मालिनी, रेखा आणि प्रेमनाथ मुख्य भूमिकेत होते. अफगाणिस्तानमध्ये चित्रीत झालेला हा पहिला बॉलिवूड चित्रपट होता.

Dharmatma movie

खुदा गवाह (1992)

अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते आणि याचे दिग्दर्शन एस. आनंदने शूट केला. काबूल आणि मजार-ए-शरीफमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले.

khuda gawah Movie

जानशीन(2003)

फिरोज खान या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. फरदीन खान आणि सेलिना जेटली या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे चित्रीकरण अफगाणिस्तान आणि थायलंडमध्ये झाले आहे.

janasheen movie

काबुल एक्सप्रेस (2006)

या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले होते. यामध्ये जॉन अब्राहम आणि अर्शद वारसी मुख्य भूमिकेत दिसले. या चित्रपटाचे चित्रीकरण देखील अफगाणिस्तानमध्ये झाले.

Kabul Express movie

तोरबाज (2020)

संजय दत्त, नर्गिस फाखरी आणि राहुल देव 'तोरबाज'मध्ये दिसले होते. गिरीश मलिक दिग्दर्शित हा चित्रपट अफगाणिस्तानच्या आत्मघाती बॉम्बर मुलांवर आधारित आहे.

Torbaaz Movie

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज, बाबूश यांच्‍या मनात आहे तरी काय?

रस्ता चुकला, गाडी चिखलात रुतली; मनालीतून गोव्याला येताना रशियन महिलेवर आले संकट, पोलिस, स्थानिक धावले मदतीला

Goa Live News: पुढील सहा महिन्यांत महामंडळाचे उत्पन्न वाढणार

Kadamba Bus: "दारू पिऊन बस चालवल्यास घरचा रस्ता दाखवणार" KTCचा आक्रमक पवित्रा; तुयेकरांनी दिले कठोर निर्देश

India vs Pakistan: Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? सामना रद्द करण्याच्या याचिकेवर Supreme Courtनं दिला 'हा' निर्णय

SCROLL FOR NEXT