‘अ’ मराठी राज्य नाट्यस्पर्धेत आजचे नाटक: ‘दी ट्रायल’  Dainik Gomantak
मनोरंजन

‘अ’ मराठी राज्य नाट्यस्पर्धेत गोव्यात आजचे नाटक: ‘दी ट्रायल’

‘दी ट्रायल’ या नाटकाच्या (Drama) कथानकात मालती म्हस्के हिच्यावर, तिची उच्च प्रतिष्ठित वर्गातली मालकीण, काव्या हिचा खून केल्याचा आरोप आहे.

दैनिक गोमन्तक

एक प्रश्न न्यायालयात (Court) नेहमीच विचारला जातो, ‘आरोप मंजूर आहे?’ खरंच इतकं सोपं असतं का हे सगळं? या प्रश्नाचे उत्तर कदाचित एका शब्दातही देता येईल किंवा या प्रश्नाच्या मागे धावताना कित्येकांचा दमही निघेल. जेव्हा एक खून होतो तेव्हा प्रश्न (Question) ‘खून’ आणि ‘खुनी’ या दोघा पुरताच मर्यादित नसतो. ते दोघे ज्या जगात असतात, त्या जगात त्यांचे लागेबंधेही स्वैरपणे पसरलेले असतात. तिथल्या माणसामाणसात, एका व्यक्तीच्या मनात रुजलेली हिंसा या लागे बांध्यातच असते का छपून? जी येते भेटायला एखाद्या सणामासी आणि उघड्यावर आणते आपले चरित्र?

आपणच लपवत असलेले आपल्याच काळोखात? मनातल्या मनात रोज कितीतरी पाडत असतो आपण खून पण जेव्हा एखाद्याच्या हातात येते आपसूकच सुरी तेव्हा, पडलेल्या खुनाचा मात्र लाल लाल होऊन जातो रंग. तेवढा एकच खून दिसतो डोळ्यांना पण त्या अंतिम खुनाकडे ढकलत ढकलत घेऊन येणाऱ्या अदृश्य हाताना मात्र आपण करतो सोयीस्कर नजरअंदाज. या अफाट न्यायालयात, एखाद्या शूद्र ठिपक्यासारखे असणाऱ्या त्या आरोपी माणसाचे दैव ठरवताना किती प्रचंड बनून जाते ही व्यवस्था! ती घेते अवाढव्य रूप आणि कोसळते त्या बिचाऱ्या ठिपक्याच्या अंगावर, करून त्याचा चेंदामेंदा! दी ट्रायल’ हे नाटक याच व्यवस्थेला प्रश्न विचारत पुढे सरकते.

नाटकाच्या (Drama) कथानकात मालती म्हस्के हिच्यावर, तिची उच्च प्रतिष्ठित वर्गातली मालकीण, काव्या हिचा खून केल्याचा आरोप आहे. कोर्टात राज्याविरुद्ध मालतीचा बचाव करत आहे तारा. तारासाठी ही केस कठीण आहे. अशा परिस्थितीत मालतीच्या पूर्वीच्या नातेवाईकांनी तिचे केलेले शोषण आणि तिच्या आयुष्यात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी आपल्या समोर येतात आणि जसेजसे हे नाटक पुढे सरकत जाते तशी नात्यांमधली गुंतागुंत उलगडत जाते.

मूळ लेखक : अधीर भट

अनुवादक : सौरभ कारखानीस

दिग्दर्शक : मयुर मयेकर

संस्था: राजहंस क्लब, पणजी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Jobs: आठवी, दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी संधी! 12 हजार तरुणांना रोजगाराचे लक्ष्य; सरकार उभारणार 25 कौशल्य केंद्रे

Labh Drishti Yog 2026: गुरु-शुक्राच्या दुर्लभ संयोगाचा मोठा चमत्कार! आजपासून 5 राशींच्या आयुष्यात सोन्याचे दिवस, बँक बॅलन्स वाढणार

IND vs PAK: आज भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार महामुकाबला! दुपारी 3 वाजता सामना, मोबाईलवर मोफत LIVE कुठे पाहता येणार?

Goa Dairy Workers: थकीत 'डीए'सह मागण्या मान्य करा, गोवा डेअरी कर्मचाऱ्यांचे 'घोषणाबाजी आंदोलन'

खरी कुजबुज: सरकारची कृपादृष्‍टी

SCROLL FOR NEXT