Tere Nam Song Dainik Gomantak
मनोरंजन

Viral Video : भंगार विक्रेत्याने गायलं 'ये प्यार मे क्यो होता है' हे गाणं...आवाजात दिसला दर्द

सोशल मिडीयावर सध्या एका भंगार विक्रेत्याने गायलेलं सलमान खानच्या 'तेरे नाम' या चित्रपटातलं गाणं खूप व्हायरल होत आहे

Rahul sadolikar

सोशल मिडीया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे कित्येकांच्या प्रतिभेला वाव मिळतो तर कित्येकांना नवी संधी मिळते. मध्यंतरी सोशल मिडीयावर काच्छा बादाम हे गाणं खूपच लोकप्रिय झालं होतं. हे गाणं एक सामान्या विक्रेता गात होता ज्याला नंतर चांगली संधी मिळाली.

आता असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यात एक भंगार विक्रेता आपल्या सुरेल आवाजात तेरे नाम चित्रपटातलं विरहगीत गाताना दिसत आहे.

या भंगार विक्रेत्याने आपल्या प्रतिभेने लोकांची मने जिंकली आहेत. होय, हा व्हिडिओ अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक सतीश कौशिक यांनी 8 फेब्रुवारीला शेअर केला होता आणि लिहिले - 20 वर्षांनंतरही लोकांमध्ये 'तेरे नाम' गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही.

 या चित्रपटाचा अभिमान आहे. खरं तर, ही क्लिप 'दर-बदर' (@Mahanaatma1) युजरने पोस्ट केली होती आणि कॅप्शनमध्ये त्याने लिहिले - येथे प्रतिभेची कमतरता नाही, फक्त त्याला योग्य वेळी योग्य मार्ग सापडत नाही.

 या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत 66 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि अडीच हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. शेकडो लोकांनी भंगार विक्रेत्याचं कौतुक केलं आहे. यांच्या आवाजाचे कौतुक केले, तर काहींनी या गायकाला संधी मिळावी अशी अपेक्षा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'मी अशा पुरुषाच्या शोधात’; ऑनलाईन अश्लील जाहिरातीला बळी पडला अन् लाखो रुपये गमावले

Tallest Ram statue in Goa India: गोव्यात उभारला जातोय देशातील सर्वात उंच श्रीरामाचा पुतळा; 28 नोव्हेंबरला PM मोदी करणार अनावरण

World Cup 2025 Final: केव्हा, कुठे अन् कधी रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनल सामना? Live मोफत कुठे पाहता येणार?

बॉलिवूडची 'श्री'कन्या, साऊथची 'अचियम्मा'! जान्हवी कपूरच्या 'Achiyyamma' लूकची हवा; राम चरणसोबत गाजवणार दक्षिणी सिनेमा

Valvanti River Flood: नोव्हेंबरमध्ये आला गोव्यातील नदीला पूर; साखळीत वाळंवटी ओव्हरफूल

SCROLL FOR NEXT