The kapil Sharma Show Promo Video Viral Dainik Gomantak
मनोरंजन

The Kapil Sharma Show: लस घ्या आणि सीट कनफर्म करा; प्रोमो होतोय व्हायरल

The Kapil Sharma Showच्या प्रोमो व्हिडीओमध्ये कपिल व्यतिरीक्त त्याची टीम सुद्धा पहायला मिळाली आहे.

दैनिक गोमन्तक

'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या शोचा प्रोमो व्हिडिओ कपिल शर्माने शेअर केला असुन, तो चांगलाच व्हायरल झाल्याचे दिसते आहे. प्रोमो व्हिडीओमध्ये कपिल शर्मा आपल्या संपूर्ण टीमसोबत शोमधील त्यांची सीट पक्की झाल्याचे सांगत आहेत. या प्रोमोमध्ये 'द कपिल शर्मा शो' ची टीम म्हणते की, आम्ही कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. या कपिल शर्मा शोच्या टीमने लोकांना कोरोना लसीबद्दल जागरूक करण्याचे काम केले आहे. (The promo video of The Kapil Sharma Show is going viral)

देशात सध्या कोरोना महामारीशी लढण्यासाठी लसीकरणावर सरकारने भर दिली असुन हीच बाब ओळखुन ‘द कपिल शर्मा शो’च्या या प्रोमो मध्ये टीमने लसीकरणाबद्दल जनजागृती केली आहे. "आम्ही सर्वांनी कोरोना व्हॅकसिनचे दोन्ही डोस घेतले आहेत. आमचे सीट कनफर्म झाले आहे. आता तुम्ही लोक शक्य तितक्या लवकर दोन्ही डोस घ्या आणि आमच्या शोमध्ये आपले सीट कनफर्म करा." असे आवाहन या व्हिडीओमधुन केल्याचे पहायला मिळते आहे.

प्रोमो व्हिडिओमध्ये कपिल शर्मा व्यतिरीक्त अर्चना पूरन सिंग, भारती सिंग, कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर, किकू शारदा आणि सुदेश लाहिरी हे कलाकार सुद्धा या टीममध्ये दिसुन येता आहेत. कपिलने शेअर केलेला व्हिडिओ काही तासांत 10 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT