The Kerla Story Dainik Gomantak
मनोरंजन

The Kerla Story : 32 हजार नव्हे द केरला स्टोरी केवळ तीन मुलींची गोष्ट...चित्रपटाचा ट्रेलर नाट्यमयरित्या बदलला..

'द केरला स्टोरी' या चित्रपटाचे ट्रेलर बदलले आहे, आता ही गोष्ट 32 हजार नाही तर तीन तरुणींची असणार आहे.

Rahul sadolikar

केरळमधील 32,000 महिला ISIS मध्ये सामील झाल्याचा दावा करणार्‍या The Kerala Story चा ट्रेलर पूर्वी यूट्यूबवर बदलण्यात आला आहे. या चित्रपटाने दावा केला होता कि, "केरळच्या विविध भागांतील तीन तरुण मुलींच्या सत्य कथा आम्ही सांगत आहोत, पण यापुर्वी चित्रपटाचं प्रमोशन करताना 32 हजार धर्मांतरित तरुणींची ही गोष्ट असल्याचं सांगण्यात येत होतं पण यावर मोठं वादंग उठल्यावर आता ट्रेलर बदलण्यात आलं आहे. 

केरळचे खासदार शशी थरूर, ज्यांनी यापूर्वी 32,000 च्या आकड्याला आव्हान दिले होते, त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना "केरळ वास्तवाची अतिशयोक्ती आणि विपर्यास" अशी टीका केली आहे.

मूळ ट्रेलरच्या दाव्यांनंतर केरळमधील राजकीय पक्ष, सरकार आणि विरोधी दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली. 32,000 केरळ महिला ISIS मध्ये सामील झाल्या आहेत हे सिद्ध करणाऱ्याला  भारतीय युनियन मुस्लिम लीग युवा शाखेने ₹ 1 कोटीचे बक्षीस देऊ केले.

प्रत्युत्तरादाखल हिंदू सेवा केंद्राच्या संस्थापकाने केरळमधील कोणतीही महिला ISIS मध्ये सामील झाली नसल्याचे सिद्ध करण्यासाठी ₹ 10 कोटी देऊ केले. वकील आणि अभिनेते सी शुक्कूर यांनी ISIS मध्ये सामील झालेल्या किमान 32 केरळ महिलांचे नाव घेणाऱ्या प्रत्येकाला ₹ 11 लाख देऊ केले. चित्रपटाचे ट्रेलर बदल्याने वाद संपलेला नाही असं म्हटलं आहे.

सनशाईन पिक्चर्स निर्मित या चित्रपटात केरळमधील तीन तरुणींची कहाणी आहे. तथापि, सुरुवातीच्या ट्रेलरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की या चित्रपटात "केरळमधील 32,000 महिलांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या टाकणाऱ्या कथा" दाखवल्या आहेत.

थरूर यांनी याआधी या आकड्याला आव्हान दिले आणि पाश्चात्य गुप्तचर सूत्रांनी सूचित केले की ISIS मध्ये सामील होणा-या भारतीयांची संख्या 100 पेक्षा कमी आहे. प्रत्युत्तर म्हणून, चित्रपटाच्या निर्मात्यांनी यूट्यूबवरील ट्रेलर बदलला, 32,000 हा आकडा काढून टाकला आणि त्याजागी "सत्य कथा" असं म्हटलं गेलं आहे. केरळच्या वेगवेगळ्या भागांतील तीन तरुण मुलींची ही कथा असल्याचं सांगितलं जात आहे.

चित्रपटाच्या दाव्यांमुळे केरळमध्ये राजकीय वाद निर्माण झाला, सत्ताधारी CPM-नेतृत्वाखालील LDF आणि विरोधी UDF या दोन्ही पक्षांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली. इंडियन युनियन मुस्लिम लीग युथ विंगने ISIS मध्ये सामील झालेल्या 32,000 महिलांच्या पुराव्यासाठी बक्षीस जाहीर करत या चित्रपटाला आव्हान दिले आहे. 

यावर आता शशी थरूर यांनी ट्विटरवर चित्रपटाच्या ट्रेलरमधील बदलावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, "कथानक घट्ट होत आहे. चित्रपट निर्मात्यांनी यूट्यूबवर चित्रपटाचे ट्रेलर बदलले आहे आणि '32,000 महिला' बदलून '3 महिला' केले आहे... मी माझ्या बाजुने थांबतो असं म्हटलं आहे ."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT