The Kerala Story In Bengal Dainik Gomantak
मनोरंजन

The Kerala Story In Bengal : बंदी उठवताच बंगालमध्ये सुपरहिट ठरला 'द केरळ स्टोरी'...

द केरळ स्टोरी हा चित्रपट बंगालमध्ये रिलीज होताच हाऊसफुल्लही झाला..

Rahul sadolikar

गेले कित्येक दिवस बंगालमध्ये द केरळ स्टोरीवर घातलेल्या बंदीची खूप चर्चा झाली. बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माचा चित्रपट The Kerala Story रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे.अदा शर्माच्या चित्रपटाच्या कथेवरून आतापर्यंत बरेच वाद झाले आहेत. चित्रपटाच्या कथेमुळे अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी'वर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे. नेत्यापासून ते अभिनेत्यापर्यंत सर्वजण चित्रपटाबाबत आपलं मत मांडताना दिसतात.

हरियाणा उत्तर प्रदेशात केरळ स्टोरी टॅक्स फ्री....

त्यातच उत्तरप्रदेश आणि हरियाणामध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला तर तामिळनाडू आणि पश्चिम बंगलामध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती.

त्यानंतर निर्मात्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि त्यानंतर गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारच्या राज्यात चित्रपटावर बंदी घालण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आणि तमिळनाडूला चित्रपट पाहणाऱ्यांच्या सुरक्षेची खात्री करण्यास सांगितले.

सिंगल स्क्रिनवर केरळ स्टोरी

आता त्यानंतर अदा शर्माचा चित्रपट सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये दाखवला जात आहे. वृत्तानुसार, थिएटर अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की ते आधीच बुक केलेले स्लॉट रद्द करू शकणार नाहीत आणि दोन किंवा तीन आठवड्यांनंतर सुदीप्तो सेन दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

बंगालमधील बहुतेक थिएटरने द केरळ स्टोरी प्रदर्शित करण्यास नकार दिला असताना, उत्तर 24 परगणा 'बनगाव'मधील सिंगल स्क्रीनने चित्रपट दाखवण्यास सुरुवात केली आहे.

थिएटर हाऊसफुल्ल

रिपोर्ट्सनुसार, त्या थिएटरमध्ये जवळपास सगळेच शो हाऊसफुल्ल आहेत आणि त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, The Kerala Story चे संगीत दिग्दर्शक, बिशाख ज्योती, मूळचे बोनगावचे आहेत आणि हे जाणून खूप उत्सुक आहेत की सर्व वाद आणि कथित धमकीचे कॉल येत असूनही श्रीमा हॉल 'द केरळ स्टोरी' दाखवत आहे.

केरळ स्टोरीची गोष्ट

केरळमधील 32,000 हिंदू महिलांना जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतरित केल्याच्या संशयास्पद दाव्यामुळे चित्रपटाची कथा वादात अडकली होती. पण तरीही ते पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकतेने चित्रपटगृहांमध्ये पोहोचत आहेत आणि चित्रपटाला प्रतिसाद मिळत आहे. अदा व्यतिरिक्त, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी देखील चित्रपटात आहेत.

थिएटर मालकांना धमकी मिळाली?

चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी एका पत्रकार परिषदेत दावा केला की, मला अनेक हॉल मालकांकडून सांगण्यात आले आहे की, त्यांना धमकावण्यात आले आहे आणि चित्रपट प्रदर्शित न करण्यास सांगितले आहे. 

चित्रपटाची मुख्य अभिनेत्री अदा शर्मा हिच्यासोबत कोलकाता येथे पत्रकार परिषदेत बोलताना सुदिप्तो यांनी दावा केला की रिलीजच्या दोन आठवड्यांत देशभरात 15-20 लाख लोकांनी चित्रपट पाहिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smriti Mandhana Wedding: नॅशनल क्रश क्लीन बोल्ड! स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात, 'या' संगीत दिग्दर्शकासोबत जुळली रेशीमगाठ

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

SCROLL FOR NEXT