The Kerala Story BO Collection
The Kerala Story BO Collection Dainik Gomantak
मनोरंजन

The Kerala Story Box Office Collection: काय सांगता? केरळ स्टोरीचा 100 कोटींच्या कमाईनंतर आता हा नवा उच्चांक....

Rahul sadolikar

The Kerala Story Box Office Collection: गेले कित्येक दिवस मनोरंजन क्षेत्रासह राजकिय क्षेत्रातही चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलेला द केरळ स्टोरी हा चित्रपट दिवसेंदिवस कमाईचे नवे नवे रेकॉर्ड बनवत आहे. 100 कोटींच्या क्वबमध्ये गेल्यानंतर चित्रपटाने आता नवा रेकॉर्ड रचला आहे.

वादांनी वेढलेला अदा शर्मा स्टारर चित्रपट 'द केरळ स्टोरी' तिकीट खिडकीवर चांगली कामगिरी करत आहे. आठवड्याचे दिवस असो किंवा वीकेंड, चित्रपट दररोज चांगले कलेक्शन करत आहे.

परदेशातही चित्रपटाची कथा पसंत केली जात आहे. 'द केरळ स्टोरी'ने पहिल्या 10 दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला असतानाच आता या चित्रपटाने 150 कोटींचा आकडाही पार केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये चित्रपटावर बंदी

पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. तर, तामिळनाडूमध्ये स्क्रीनिंग झाले नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना, भारतात जिथे जिथे हा चित्रपट प्रदर्शित झाला, तिथे या चित्रपटाने एकूण आकडेवारीसह 12 व्या दिवशी 9.80 कोटींची कमाई केली.

  चित्रपटाची एकूण कमाई 156.84 कोटींवर गेली आहे. रिपोर्ट्सनुसार, या आकड्यानंतर हा चित्रपट 2023 मधील 5वा सर्वात मोठा ओपनर बनला आहे. 

ब्रिटनमध्ये चित्रपटावरची बंदी उठवली

हा चित्रपट 12 मे रोजी जगभरात प्रदर्शित झाला. हा चित्रपट अमेरिकेतील ३७ देशांमध्ये प्रदर्शित होणार होता, मात्र शेवटच्या क्षणी ब्रिटनमध्ये चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले. पण आता ही बंदीही हटवण्यात आली असून तिथले लोक 'द केरळ स्टोरी' देखील पाहू शकतात. दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी याबद्दल ट्विट करून चाहत्यांशी ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. 

आतापर्यंतचे चित्रपटाचे कलेक्शन

'द केरळ स्टोरी'च्या आतापर्यंतच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने 8.03 कोटींची ओपनिंग केली आहे. अशाप्रकारे या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 81.36 कोटींची कमाई केली आहे. यानंतर चित्रपटाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात 19.50 कोटींनी झाली. दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाचा आतापर्यंतचा एकूण व्यवसाय 63.35 कोटींवर गेला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mormugao Port: बिर्लाचा गोव्याला रामराम, महाराष्ट्रात हलविले कामकाज; आमदार संकल्प आमोणकरांवर गंभीर आरोप

PM Modi In Goa: पीएम मोदी 150 कोटी घेऊन येणार? सभेपूर्वी पंतप्रधानावर गोवा काँग्रेसकडून प्रश्नांचा भडीमार

Amthane Dam Water : ‘आमठाणे’त अखेर पाणी; जलस्रोत खात्याकडून उपाययोजना

Lok Sabha Election 2024: तेलंगणाचे CM रेवंत रेड्डी यांची जीभ घसरली; PM मोदींना म्हणाले 'काळा साप'

Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT