इस्रायली चित्रपट निर्माते आणि भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 (IFFI 2022) चे ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी 'द काश्मीर फाइल्स'वर वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून वादात सापडलेल्या इस्रायली चित्रपट निर्मात्याने आता माफी मागितली आहे. एका नवीन अहवालानुसार, 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) वर केलेल्या विधानावर काही दिवसांनी नदव म्हणाले की 'लोकांचा किंवा त्यांच्या नातेवाईकांचा अपमान करण्याचा माझा कधीही हेतू नव्हता'.
नदव यांच्या टिप्पणीचा चित्रपटाच्या टीमने तीव्र निषेध केला
गोव्यात (Goa) 22 नोव्हेंबर पासून इफ्फीला (IFFI) सुरुवात झाली. या महोत्सवाच्या समारोप समारंभात नदव यांनी 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावर वादग्रस्त विधान केले होते. यानंतर नव्या वादाला वळण मिळाले. चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेते अनुपम खेर आणि पल्लवी जोशी यांच्यासह द काश्मीर फाईल्सच्या टीमने नदव यांच्या विधानाचा तीव्र निषेध सोशल मिडियावर दर्शवला होता.
पीडितांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता
एका वृत्ताशी बोलतांना त्यांनी सांगितले की, “मला कोणाचाही अपमान करायचा नव्हता आणि पीडितांचा किंवा त्यांच्या नातेवाईकांचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. मी केलेल्या विधानावर माफी मागतो."
इफ्फीच्या ज्युरी सदस्यांपैकी एक असलेल्या सुदीप्तो सेन यांनी इस्रायली चित्रपट निर्मात्याने केलेले विधान हे त्यांचे "वैयक्तिक मत" असल्याचे म्हटले होते. ट्विटरवर (Twitter) सुदीप्तोने त्यांचे विधान शेअर केले होते, "इफ्फी 2022 ज्युरी प्रमुख नदव लॅपिड यांनी 53 व्या इफ्फीच्या समारोप समारंभात मंचावरून काश्मीर फाइल्स चित्रपटाबद्दल जे काही सांगितले ते पूर्णपणे त्यांचे वैयक्तिक मत होते."
इस्त्रायलचे वृत्तपत्र हारेट्झला दिलेल्या मुलाखतीत, नादव म्हणाले होते की ते त्यांच्या टिप्पण्यांवर ठाम आहेत, कारण त्यांना "चित्रपटाच्या रूपात प्रोपगंडा कसा ओळखायचा हे माहित आहे." ते म्हणाले, "वाईट चित्रपट बनवणे हा गुन्हा नाही, पण हा एक अतिशय क्रूर आणि हिंसक प्रचार करणारा चित्रपट (Movie) आहे. खंर तर मी सुद्धा मदत करू शकत नाही, पण एक दिवस लवकरच इस्रायलमध्ये अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते." आणि मला आनंद होईल की अशा परिस्थितीत एक परदेशी ज्युरी प्रमुख जसे ते पाहतील तसे बोलण्यास तयार असेल." ते असेही म्हणाले की 'राजकीय दबावामुळे चित्रपट अधिकृत महोत्सवाच्या स्पर्धेत सहभागी केला गेला'.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.