Shahrukh Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Shah Rukh Khan: शाहरुख खानचं पश्तूनी पठाण परंपरेशी काय नातं आहे? पठाणांचा इतिहास काय?

अभिनेता शाहरुख खानचा पठान सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे. पण यानिमित्ताने पश्तूनी परंपरेची आठवण काढली जातेय.

Rahul sadolikar

शाहरुख खानचा पठान सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे त्यानिमीत्ताने पश्तून पठान परंपरेवर चर्चा केली जातेय. कारण शाहरुख याच पश्तूनी परंपरेशी नातं सांगतो. पठानांची काही वेगळी गुणवैशिष्ट्ये सांगितली जातात.

काही ठिकाणी पठानांचा उल्लेख युद्धखोर असा केला जातो तर काही ठिकाणी पठानांच्या चिवटपणाचं कौतुक केलं जातं नेमकी काय आहे ही पठानांची गोष्ट आणि सुपरस्टार शाहरुखचं काय आहे नातं या पठान परंपरेशी?

यानिमित्ताने पठाणी किंवा पश्तून परंपरेची आठवण काढली जातेय. शाहरुख खानचे कुटूंब हे देशप्रेमी म्हणुन ओळखलं जातं.शाहरुखचं कुटुंब याच पश्तुनी परंपरेचा भाग आहे. त्याचे वडिल मीर ताज मोहमद खान पश्तून होते.

गांधीजींचे अनुयायी खान अब्दुल गफार खान उर्फ बादशहा खान यांना त्यांनी आपला नेता मानलं होतं. बादशहा खान यांच्या खुदा-ई-खिदमतकार या संघटनेचे ते सदस्य होते. पठानांचा नेता म्हणुन बादशहा खान त्यांची ओळख होती.

इतिहासाच्या पानांमध्ये पठाणांची प्रतिमा ही हिंसक, सूडबुद्धीचे असाच आहे. पठान मरण पत्करतील पण शत्रूपुढे झुकणार नाहीत असं म्हटलं जातं. बादशाह खान यांनी या झुंजार जमातीला अहिंसा शिकवली . बातमीत वापरलेलं फोटोत शाहरुखच्या हातात जे पुस्तक आहे ते खुदा- ई-खिदमतगारच्या आणि बादशाह खान यांच्या इतिहासावर भाष्य करतं. भारत सरकारने या कार्याबद्दल बादशहा खान यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव केला.

शाहरुखच्या अंगी असणारा झुंजार बाणा, नम्रपणा , कणखरपणा, परिस्थितीला अजिबात शरण न जाण्याची लढावू वृत्ती कुठून येते याचं उत्तर कदाचित त्याच्या पठानी परंपरेत मिळु शकेल. पठान चित्रपटाला विरोध करत असताना एका संताने तर शाहरुखला जिवंत जाळण्याची भाषा केली ;पण शाहरुखने आपला संयम सोडला नाही. त्याने बॉयकॉट ट्रेंडला आपल्या कामातुन उत्तर दिलं. शाहरुखचा या काळातला संयम खरंच वाखाणण्याजोगा होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT