Shahrukh Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Shahrukh Khan: ओटीटी शो मध्ये झळकलेली 'ही' अभिनेत्री शाहरुखसोबत दिसणार रुपेरी पडद्यावर

Shahrukh Khan: तिने या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले आहे.

दैनिक गोमन्तक

Shahrukh Khan: पठाणच्या यशानंतर शाहरुख खान आता एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. किंग खानचा हा चित्रपट कसा असणार याबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता तर आहेच चर्चा मात्र अभिनेत्री आणि गायिका असलेल्या संजीता भट्टाचार्यची रंगली आहे.

'फील्स लाइक इश्क' आणि 'ब्रोकन न्यूज' यासारख्या ओटीटी शोमध्ये दिसून आलेली ही अभिनेत्री बॉलीवुडमध्ये डेब्यू करताना दिसणार आहे. महत्वाचे म्हणजे बॉलीवूडमधील तिचा पहिला डेब्यू शाहरुख खानसारख्या सुपरस्टारबरोबर आहे. ती शाहरुखसोबत त्याचा आगामी चित्रपट जवानमध्ये दिसून येणार आहे.

संजीता अभिनेत्रीबरोबरच एक गायिकादेखील आहे. ज्यावेळी तिला ऑडीशनसाठी बोलवण्यात आले होते तेव्हा ती एका म्युजिकल कॉन्सर्टसाठी कोलकातामध्ये होती. जेव्हा तीने मुंबईत ऑडीशन दिले तेव्हा तिला माहीतही नव्हते की ती शाहरुखसोबत काम करणार आहे. संजना म्हणते की, सुरुवातीला मला या प्रोजेक्टबाबत जास्त माहीती नव्हती मात्र ऑडीशनच्या दरम्यान मला संपूर्ण माहीती दिली.

जेव्हा मला समजले शाहरुख खान सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे तेव्हा मी हैरान झाले. तिने या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले असून संजिता म्हणते हा चित्रपट माझ्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनला आहे.

शाहरुखसोबत काम करणे म्हणजे संजीताचे स्वप्न पूर्ण होण्यासारखे होते. ती म्हणते - मी कधीही विचार केला नव्हता की मी एक दिवस शाहरुखसोबत कॉफी घेईन, गाणी म्हणेल आणि डान्स करेल,असे वाटत होते की मी स्वप्न बघत आहे.

सेटवर सहजता असण्यासाठी आणि कोणतेही दडपण येऊ नये यासाठी शाहरुख स्वता प्रयत्नशील असायचा. जेव्हा किंग खानला माहित झाले की संजिता एक म्युजिक डायरेक्टर आणि सिंगर आहे तेव्हा शाहरुखने तिच्यासाठी एक गिटार आणि मायक्रोफोन मागवला होता.

पुढे संजिता म्हणते- ' मला माहीत होते हा चित्रपट लाखो लोक पाहणार आहेत. त्यामुळे 'जवान' साठी मी वेळ न घालवता होकार कळवला होता. शुटिंगच्या अनुभवांबद्दल बोलताना ती म्हणते तुम्ही अनुभवी लोकांसोबत काम करता तेव्हा तुम्ही पुढचा टप्पा गाठत असता, तुमची प्रगती होत असते. तुम्ही शिकत असता आणि पुढे जात असता. शाहरुखचे वागणे एखाद्या मित्रासारखे होते आणि हा अनमोल खजाना आहे जो मला जवानच्या सेटवर मिळाला आहे.'

दरम्यान, शाहरुखच्या पठान चित्रपटाने फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगभरात धुमाकुळ घातला होता. ज्या चित्रपटाला देशभरातून विविध संघटनांनी विरोध केला त्या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आता चाहत्यांमध्ये त्याचा आगामी चित्रपट 'जवान' बद्दल उत्सुकता असल्याचे पाहायला मिळाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT