Divyanka Tripathi  Dainik Gomantak
मनोरंजन

शरद मल्होत्रासोबतचं ब्रेकअप, मुल दत्तक घेण्याचा निर्णय...'ये है मोहब्बतें' फेम दिव्यांकाच्या आयुष्यातले ते चढ-उतार

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आयुष्यात आलेल्या चढ- उतारांबद्दल सांगितलं आहे.

Rahul sadolikar

Divyanka Tripathi talking about her Brake-up with Sharad Malhotra : 'ये है मोहब्बते' फेम अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातल्या चढ उतारांविषयी सांगितलं आहे.

या मुलाखतीत तिने शरद मल्होत्रासोबतचे ब्रेकअप आणि त्यानंतर झालेला मानसिक त्रास याबद्दल सांगितलं आहे. चला पाहुया दिव्यांकाने नेमकं काय सांगितलं आहे.

दिव्यांकाच्या आयुष्यातले चढ उतार

टेलिव्हीजन अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीच्या शरद मल्होत्रासोबतच्या ब्रेकअपवर मनोरंजन विश्वात खूप चर्चा झाली होती.

दोघांचं रिलेशन तुटण्यामागे नेमकं काय कारण असावं यावरही बऱ्याचदा सोशल मिडीयावर चर्चा झाली मात्र आता स्वत: दिव्यांकानेच या विषयावर मौन सोडले आहे.  प्रेमात ब्रेकअप झाल्यानंतर त्याने स्वतःला कसे सावरले याबद्दलही दिव्यांका बोलली आहे. 

इतकंच नाही तर तिला आई व्हायचं होतं, तिला एक मूल दत्तक घेऊन स्वत:चं कुटुंब परिपूर्ण करायचं होतं.  

'ये है मोहब्बतें' फेम दिव्यांकाने ब्रेकअपनंतर को-स्टार विवेक दहियासोबत लग्न केले. दोघेही आज टेलिव्हिजन इंडस्ट्रीतले प्रसिद्ध जोडपे आहेत. दोघांच्या लग्नाला 8 वर्षे पूर्ण झाली आहेत.

दिव्यांका आणि शरद

शरद मल्होत्रा ​​आणि दिव्यांका त्रिपाठी यांनी 'बनून में तेरी दुल्हन'मध्ये एकत्र काम केले होते. कामासोबतच दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम झाले. दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी मनोरंजन विश्वात खळबळ माजली होती.

मात्र काही कारणांमुळे त्यांचे नाते तुटले. आता 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत दिव्यांका त्रिपाठीने ब्रेकअपवर प्रतिक्रिया दिली आहे.

आईने दिला सल्ला

दिव्यांका त्रिपाठीने उत्तर दिले की, प्रेमाला दुसरी संधी देणे किती कठीण आहे? यावर ती म्हणते, 'हा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. त्यावेळी माझी आई माझ्यासोबत राहत होती. मला फ्रॅक्चर झाले होते. 

मी अजूनही रोज कामासाठी जायचे आणि इतर प्रोजेक्टवरही काम करत होते. मला स्वतःला व्यस्त ठेवायचे होते जेणेकरून मी स्वत:ची आणि माझ्या मनाची काळजी घेऊ शकेन. पण माझ्या आईने मला समजावले की असे चालणार नाही. मला स्वतःवर प्रेम करावे लागेल.

मुल दत्तक घेणार होती

या मुलाखतीत दिव्यांका त्रिपाठीने एक मोठा खुलासा केला होता की, ती एक मूल दत्तक घेणार होती. त्यासाठी त्यांनी पूर्ण तयारीही केली होती. 

आयुष्यातला हा मोठा धक्का पचवून दिव्यांकाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांचे 2016 मध्ये लग्न झाले होते. सध्या दोघांना मूलबाळ नाही. दोघेही आपापल्या कामावर लक्ष केंद्रित करत आहेत.

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

मुलाचा घटस्फोट, आईने घातला दुधाने अभिषेक; 'हॅप्पी डिव्होर्स' केक कपणाऱ्या तरुणाचा Video Viral

SCROLL FOR NEXT