Movie Based on Teacher - Student Relation: 5 सप्टेंबर हा दिवस भारताचे पहिले उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. एक आदर्श शिक्षक म्हणुन आपला लौकिक देशभरात निर्माण करणाऱ्या या महान राष्ट्रीय नेत्याचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणुन साजरा केला जातो.
एक शिक्षक एक पिढी घडवत असतो असं म्हणतात. एक विद्यार्थी घडतो तेव्हा पर्यायाने त्याचं कुटूंब आणि समाज घडत असतो. विद्यार्थी आणि शिक्षकांचं नातं हे समाज घडण्याच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा भाग असतो.
बॉलीवूडनेही शिक्षक आणि विद्यार्थी यांचं विलक्षण नातं मांडणाऱ्या काही चित्रपटांची निर्मिती केली आहे. चला पाहुया शिक्षक दिनानिमित्त समाज घडवणाऱ्या शिक्षकाची गोष्ट सांगणारे हे चित्रपट
दरवर्षी, शिक्षक दिन 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस शिक्षकांनी समाज घडवण्यासाठी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्यासाठी ते करत असलेल्या महान कार्याची आठवण म्हणुन साजरा केला जातो .
हा दिवस विद्वान आणि भारतरत्न प्राप्तकर्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती स्मरण करतो, ज्यांचा जन्म १८८८ मध्ये या दिवशी झाला होता. ते स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती (1952-1962), आणि 1962 साली ते भारताचे दुसरे राष्ट्रपती होते..
प्रत्येक विद्यार्थ्याच्या आपल्या शिक्षकासोबतच्या आठवणी नेहमीच खास असतात. शिक्षक हा माणसाच्या आयुष्याला योग्य दिशा दाखवतात.
आणि जेव्हा विद्यार्थी-शिक्षक बाँडचा विषय येतो तेव्हा बॉलीवूडही त्यावर दर्जेदार निर्मिती करण्यात मागे राहत नाही. चला पाहुया बॉलीवूडचे हे काही निवडक चित्रपट.
हा चित्रपट हृतीक रोशनच्या आजवरच्या सुंदर परफॉर्मन्सपैकी एक आहे. सुपर 30 मध्ये, हृतिक रोशनने आनंद कुमार या गणित विषयातल्या तज्ज्ञ शिक्षकाची भूमिका साकारली आहे.
हा शिक्षक गरीब आणि वंचित विद्यार्थ्यांना IIT एन्ट्रान्स परीक्षेची तयारी करुन घेतो . विकास बहल दिग्दर्शित, या चित्रपटात मृणाल ठाकूर आणि पंकज त्रिपाठी यांचीही भूमिका होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
विद्यार्थी-शिक्षक बंधाबद्दल बोलताना, आमिर खान दिग्दर्शित ' तारे जमीन पर' हा चित्रपट आपण कसा चुकवू शकतो ? ही एक डिस्लेक्सिक मुलाची आणि त्याच्या कला शिक्षकाची कथा आहे, जो त्याला त्याच्या शिकण्याच्या अडचणींवर मात करण्यास मदत करतो.
2007 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचे समीक्षक आणि प्रेक्षकांनी सारखेच कौतुक केले होते. दर्शिल सफारी या बालकलाकाराने चित्रपटात केलेल्या कामाने अनेकांचे डोळे पाणावले होते.
एक संवेदनशील शिक्षक आपल्या प्रेम आणि आपुलकीने एका विद्यार्थ्यामध्ये कसा आत्मविश्वास जागृत करु शकतो त्याची ही गोष्ट आहे.
हिचकी चित्रपटात मुख्य भूमिकेत राणी मुखर्जी दिसली होती. या चित्रपटात राणीने अफलातुन काम केलं आहे. विद्यार्थ्यांशी कनेक्ट होण्यासाठी आणि त्यांच्या स्वतःच्या आव्हानांवर मात करण्यासाठी त्यांना मदत करणाऱ्या एका शिक्षिकेचा मनस्वी प्रयत्न हा चित्रपट दाखवतो.
राणीने टॉरेट सिंड्रोम असलेल्या शिक्षिकेची भूमिका साकारली, जी वंचित विद्यार्थ्यांना शिकवण्याचे आव्हान स्वीकारते. हिचकी बॉक्स ऑफिसवर तितकासा हिट झाला नसला तरी दर्जेदार चित्रपट म्हणुन प्रेक्षकांना आठवत राहील.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित , या चित्रपटात राणी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या आणि समीक्षकांकडून तसेच प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या होत्या.
हा चित्रपट एक अंध आणि मूकबधिर मुलगी आणि तिचा शिक्षक यांच्यातील नातेसंबंधांवर आधारित आहे. अमिताभ बच्चन यांनी साकारलेला शिक्षक आणि राणीने साकारलेल्या अंध विद्यार्थीनीला तिला तिच्या अपंगत्वाचे अडथळे दूर करण्यास मदत करतो.
हा एक हृदयस्पर्शी चित्रपट आहे जो मूकबधिर क्रिकेटपटू आणि त्याच्या गुरूची गोष्ट सांगतो. क्रिकेटच्या वेडापायी आपल्या कुटूंबाच्या रोषाला सामोरा जाणारा इकबाल शेवटी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो.
शिक्षकाची भूमिका नसीरुद्दीन शाहने साकारली आहे, जो श्रेयस तळपदेच्या पात्राला भारतीय क्रिकेट संघासाठी खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करतो.