Jennipher Mistry Controversy Dainik Gomantak
मनोरंजन

Jennipher Mistry Controversy : तारक मेहताच्या आधीचा दिग्दर्शक म्हणाला "जेनिफर मिस्त्री ही"...वाचा सविस्तर

गेल्या काही दिवसांपासुन तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या वादांना नवी वळणं मिळत आहेत.

Rahul sadolikar

गेले काही दिवस टेलिव्हिजन इंडस्ट्रीच्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या वादांनी चर्चा व्यापल्या आहेत. मालिकेतील अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सिवालने निर्माता असित मोदींच्या विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले आणि इंडस्ट्रीत भूकंप झाला. आता यावर मालिकेचे आधीचे दिग्दर्शक मालव राजदा यांनी मत व्यक्त केले आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टीव्ही मालिका बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षकांना भुरळ घालत आहे, पण कॅमेऱ्याच्या मागेही सेटवर बरेच काही घडत आहे. अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल गेल्या 14 वर्षांपासून या शोमध्ये 'रोशनी सोधी'ची भूमिका साकारत आहे. नुकतेच त्याने निर्मात्यांवर खळबळजनक आरोप केले होते.

जेनिफरचे आरोप आणि इंडस्ट्रीत गदारोळ

जेनिफर मिस्त्रीच्या आरोपानंतर गदारोळ झाला होता. दुसरीकडे, निर्माता असित मोदी यांनी स्पष्टीकरण दिले आणि जेनिफरवर 'तिला डिसिप्लन नसल्याचा' असल्याचा आरोप केला, तर मालिकेतील 'आत्माराम तुकाराम भिडे' म्हणजेच मंदार चांदवडकर यांनीही टीमला पाठिंबा दिला, ज्यामुळे जेनिफर खूप दुखावली गेली कारण ती मंदारला मित्र मानत होती. आता या वादात शोचे माजी दिग्दर्शक मालव राजदा यांनीही आपलं मत मांडलं आहे.

मालव राजदा...तारकचे आधीचे दिग्दर्शक

'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे माजी दिग्दर्शक मालव राजदा यांनी जवळपास 14 वर्षांपासून जेनिफर मिस्त्री बन्सीवालसोबत दिग्दर्शक म्हणुन काम केले आहे. त्याने अभिनेत्रीवर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.  ETimes शी बोलताना त्याने जेनिफरला आनंदी व्यक्ती म्हटले आणि सेटवर ती सर्वात मैत्रीपूर्ण असायची असेही सांगितले.

जेनिफरसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल मालव राजदा म्हणाले, 'जेनिफर ही सेटवरील सर्वात आनंदी व्यक्तींपैकी एक आहे. दिग्दर्शनाची टीम असो, डीओपी असो, हेअर-मेकअप असो किंवा को-स्टार्स असो, सेटवर त्याचे सर्वांशी चांगले संबंध होते. मी 14 वर्षांपासून सेटवर आहे आणि जेनिफरने कधीही माझ्यासमोर कोणाशीही गैरवर्तन केले नाही. सेटवर ती कधीही गैरवर्तन करत नाही.

जेनिफरवरचे आरोप खोटे..दिग्दर्शक म्हणाले

जेनिफरमध्ये शिस्तीचा अभाव होता किंवा सेटवर उशिरा पोहोचत असे हे दावे मालव राजदाने फेटाळून लावले. तो म्हणाला, 'ज्यापर्यंत ती सेटवर उशिरा यायची असे दावे केले जात आहेत, मी म्हणेन की तिच्यामुळे माझ्या शूटला त्रास झाला असे 14 वर्षांत कधीच घडले नाही. 

बरेच कलाकार सेटवर उशिरा पोहोचतात आणि आम्हाला मुंबईचं ट्रॅफिक माहित आहे. त्यामुळे अर्धा तास उशीर झाला तरी चालेल. अनेकवेळा आम्ही कलाकारांच्या शूटिंगचा वेळ १२ तासांपेक्षा जास्त वाढवला आहे. गेल्या 14 वर्षांत जेनिफरमुळे माझ्या शूटिंगला कधीही त्रास झाला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT