TMKOC New Controversy  Dainik Gomantak
मनोरंजन

TMKOC New Controversy : 'तारक मेहता'च्या शोचा नवा वाद ;आता या अभिनेत्रीचे गंभीर आरोप...

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेले काही दिवसांपासुन सतत वादाच्या केंद्रस्थानी आहे.

Rahul sadolikar

गेली काही दिवस टेलिव्हिजनच्या विश्वातील अभूतपूर्व वादग्रस्त मालिका म्हणुन तारक मेहताकडे पाहायला हवे. या मालिकेत काम करणाऱ्या कित्येक कलाकारांनी थेट मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्याविरोधात केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनी सोशल मिडीयाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय मालिकेत रोशन सोधीची भूमिका करणाऱ्या जेनिफर मिस्त्रीने निर्मात्यांवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप लावल्यानंतर, या शोचा पूर्वी भाग असलेल्या एका अभिनेत्रीनेही आपले तोंड उघडले आहे. अलीकडेच शोमध्ये बावरीची भूमिका करणारी मोनिका भदोरिया, ती मालिकेत काम करत असताना तिला झालेल्या गैरवर्तनाबद्दल बोलली आणि आता रीटा रिपोर्टरच्या पात्रात दिसलेली आणखी एक अभिनेत्री प्रिया आहुजा राजदा हिने 'मानसिक छळ' केल्याचा आरोप केला आहे. 

प्रिया आहुजाचा आरोप

ई टाईम्सच्या वृत्तानुसार, प्रिया आहुजा राजदाने शोमध्ये असतानाचा अनुभव सांगितला, "होय कलाकारांना तारक मेहतामध्ये काम करताना मानसिक छळाला सामोरे जावे लागते… मानसिकदृष्ट्याही मी तिथे काम करताना अडचणींचा सामना केला आहे.

पुढे बोलताना प्रिया आहुजाने सांगितले कि त्याचा माझ्यावर फारसा परिणाम झाला नाही कारण मालव, माझे पती, जो 14 वर्षे शोचा दिग्दर्शक होता, तो कमावत होता. तिथे काम करण्याचा मला एक फायदा झाला कारण माझ्याकडे करार नसल्यामुळे मला कधीच थांबवले गेले नाही. 

मी असित मोदींना मेसेजेस केले होते ;पण

त्यांनी माझ्याशी कधीही गैरवर्तन केले नाही. पण कामाचा प्रश्न आहे, माझ्यावर अन्याय झाला आहे. मी मालवशी लग्न केल्यानंतर त्यांनी माझा ट्रॅक कमी केला. आता पूर्वीसारखे राहिले नाही. गरोदरपणानंतर आणि मालवने शो सोडल्यानंतर शोमधील माझ्या ट्रॅकबद्दल मला काहीही माहिती नव्हती. 

मी असित भाऊंना बर्‍याच वेळा मेसेज केला आणि शोमधील माझ्या ट्रॅकबद्दल विचारले पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. कधी-कधी ते “अरे तुला काम करण्याची काय गरज आहे? मालव काम करतोय ना” अशी कमेंट करायचे. 

पूर्वी फरक पडत नव्हता कारण

प्रिया आहुजा म्हणाली "मला हा शो मिळाला नाही कारण मी मालवची पत्नी आहे. मालवशी लग्न करण्यापूर्वी मी या शोचा एक भाग होतो. मला कधीच योग्य प्रतिसाद मिळाला नाही. मालव शूटिंग करत होता आणि मी देखील काही किंवा इतर गोष्टींवर काम करत होतो, त्यामुळे माझ्यावर आर्थिक परिणाम होत नव्हता, म्हणून मी कधीही बोलण्याची तसदी घेतली नाही," .

या आधी जेनिफरचे आरोप

जेनिफर मिस्त्रीने 'एएनआय'शी संवाद साधताना सांगितले होते की, 'मी असित कुमार मोदी, प्रोजेक्ट हेड सोहेल रमानी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरोधात 4 एप्रिलला मसुदा पाठवला होता. मी फक्त माझे पैसे मागत नाही तर मी सत्यासाठी उभी आहे. आपण जे केले ते चुकीचे होते हे तिघांनाही मान्य करावे लागेल.

गेल्या काही दिवसांपासुन हा वाद खूप मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर चर्चेत होता. असित मोदी यांच्यावर जेनिफरने आरोप केल्यानंतर मोदी यांच्या अडचणी वाढल्या होत्या कारण त्यानंतर याच मालिकेतील मुख्य अभिनेते शैलेश लोढा यांनीही निर्माता असित मोदी यांच्यावर पेमेंट थकवल्याचा आरोप केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ट्रॉलर्स मालकांचे आंदोलन! बंदी असताना नियमांचे उल्लंघन; पारंपरिक मच्छीमारांवर बेकायदेशीर मासेमारीचा आरोप

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

SCROLL FOR NEXT