Southern film superstar Rajinikanth | Rajinikanth 72th Birthday | Superstar Rajinikanth's Birthday | Shri Devi  Dainik Gomantak
मनोरंजन

Rajinikanth 72th Birthday: श्रीदेवींनी रजनीकांतसाठी केला 7 दिवस उपवास अन्...

Rajinikanth B'Day: रजनीकांत आज आपला 72 वा वाढदिवस साजरा करत आहे.

दैनिक गोमन्तक

Rajinikanth Birthday: साऊथ चित्रपट ते बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे रजनीकांत अजूनही इंडस्ट्रीत अॅक्टिव आहेत. त्यांनी राजकारणातही प्रवेश केला आहे. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत रजनीकांत यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपट पडद्यावर अनेक अभिनेत्रींसोबत त्यांनी काम केले आहे. परंतु ज्या चित्रपटात रजनीकांत (Rajinikanth) श्रीदेवीसोबत ऑनस्क्रीन दिसले तो चित्रपट हिट ठरला. पण तुम्हाला माहित आहे का की श्रीदेवीने रजनीकांतसाठी 7 दिवस उपवास केला होता. अ

रजनीकांत (Rajinikanth) आणि श्रीदेवी त्यांच्या काळातील प्रसिद्ध आणि डिमांडिंग स्टार होते. या दोघांनी केवळ साऊथ चित्रपटांमध्येच चमक दाखवली नाही, तर त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडमध्येही (Bollywood) भरपूर कमाई केली. दोघांनी जवळपास 25 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. यातील बहुतांश चित्रपट कन्नड, मल्याळम, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये आहेत. 'फरिश्ते', 'चालबाज', 'भगवान दादा', 'जुल्म' आणि 'गैर लेगी' हे रजनीकांत आणि श्रीदेवी यांचे सुपरहिट चित्रपट होते. 

  • श्रीदेवी यांनी रजनीकांतसाठी ७ दिवस केला उपवास

'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत रजनीकांत यांनी सांगितले की, 2011 मध्ये जेव्हा ते त्यांच्या 'राणा' चित्रपटाचे शूटिंग करत होते, त्यावेळी त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांना उपचारासाठी सिंगापूरला न्यावे लागले. श्रीदेवीला जेव्हा हे कळले तेव्हा ती खूप अस्वस्थ झाली. रजनीकांत यांची प्रकृती सुधारण्यासाठी त्यांनी शिर्डीला जाण्याचा निर्णय घेतला. शिर्डीला भेट दिल्यानंतर त्यांनी रजनीकांत यांच्या प्रकृतीसाठी 7 दिवस उपोषण केले जेणेकरून रजनीकांत लवकरात लवकर बरे व्हावे.

श्रीदेवीची प्रार्थना सर्वशक्तिमानाने स्वीकारली आणि रजनीकांत पूर्णपणे बरे होऊन भारतात परतले. रजनीकांत घरी परतताच श्रीदेवी पती बोनी कपूरसोबत त्यांना भेटायला आल्या. रजनीकांत यांच्या तब्येतीत झालेली सुधारणा पाहून श्रीवेदीच्या जीवात जीव आला.आज श्रीदेवी या जगात नसून त्यांचे सहकलाकारांसोबत नेहमीच चांगले संबंध होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT