Taapsee Pannu Dainik Gomantak
मनोरंजन

Taapsee Pannu: रकुल पाठोपाठ तापसीची लगीनघाई ! डेन्मार्कच्या प्रसिद्ध बॅडमिंटनपटूबरोबर बांधणार लग्नगाठ

Taapsee Pannu: दोघेही आपले फोटो सोशल मिडियावर पोस्ट करत असतात.

दैनिक गोमन्तक

Taapsee Pannu to marry denmarks popular badminton player Mathias Boe

रुपेरी पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना मोठी उत्सुकता असते. त्यामुळे या कलाकारांच्या वैयक्तिक जीवनातील कोणत्याही घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसतात. बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि निर्माता जॅकी भगनानी यांनी नुकतीच गोव्यात लग्नगाठ बांधली आहे, त्यामुळे तिच्या लग्नाविषयी दररोज अपडेट्स पाहायला मिळत होते. आता तिच्यानंतर तापसी पन्नूने लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचा म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तापसी तिच्या बॉयफ्रेंडसोबत सुमारे 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. मॅथियास बो ( Mathias Boe )असे तिच्या बॉयफ्रेंडचे नाव असून तो डेन्मार्कमधील प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहे. या जोडप्याने कधीही आपल्या नात्याविषयी लपवले नाही. दोघेही आपले फोटो सोशल मिडियावर पोस्ट करत असतात.

आता त्यांनी 2024 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी लग्नासाठी राजस्थानची निवड केली आहे जिथे शाही पद्धतीने लग्न होणार असल्याची चर्चा आहे. मार्चमध्ये ते विवाहबंधनात अडकले होते. यापूर्वी प्रियांका चोप्रा, परिणीती चोप्रा, कतरिना कैफ आणि कियारा अडवाणी या अभिनेत्रींनीही त्यांच्या लग्नासाठी राजस्थानची निवड केली होती. मात्र तापसीने याबाबत अद्याप अधिकृत वक्तव्य केले नाही. आता ती अधिकृतरित्या तिच्या चाहत्यांना लग्नाबद्दल सांगणार यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Taapsee Panuu

दरम्यान, तापसी पन्नू ही मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री असून तीने विविध भूमिका साकारत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. महत्वाचे म्हणजे, ही अभिनेत्री फक्त बॉलीवूडमध्येच काम करत नसून ती तेलगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

2010 मध्ये तापसीने  'जुमानडी नद्दम'  नादम' या तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. बॉलीवूडबद्दल बोलायचे झाले तर त्याने 2013 मध्ये 'चश्मे बद्दूर' मधून पदार्पण केले होते. पिंक, थप्पड, हसीन दिलरुबा, बदला, नाम शबाना आणि शाबास मिठू यासारख्या चित्रपटामुले ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचली आहे. महत्वाचे म्हणजे, फिटनेससाठीदेखील तापसी पन्नू ओळखली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT