Taapsee Pannu Dainik Gomantak
मनोरंजन

Taapsee Pannu: 'मी अ‍ॅनिमल सारखा चित्रपट कधीच करणार नाही' असं का म्हणाली तापसी?

Taapsee Pannu: तर हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हा महत्वाचा फरक आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Taapsee Pannu: रणबीर कपूरच्या अॅनिमल चित्रपटाची मोठी चर्चा झाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर कमाईचे नवीन रेकॉर्ड सेट केले आहेत. काहींनी चित्रपटाचे कौतुक केले तर काहींनी चित्रपटावर टीका देखील केली आहे. आता यावर अभिनेत्री तापसी पन्नूनेदेखील आपले मत मांडले आहे.

तापसी म्हणते, ती रणबीरच्या 'अॅनिमल'ची फॅन नाही आणि अशा चित्रपटाचा भाग कधीच बनणार नाही. मात्र, तापसीने अद्याप हा चित्रपट पाहिला नाही आणि ती पाहणारही नाही. तापसी पन्नूने राज शामानी यांच्याशी त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हटले आहे की, स्वतः असा चित्रपट कधीच करणार नसल्याचेही सांगितले.

तापसी पन्नू पुढे म्हणते म्हणाली, 'बर्‍याच लोकांनी मला या चित्रपटाबद्दलखूप काही सांगितले. मी अतिरेकी नाही, म्हणून मी बर्‍याच लोकांशी असहमत आहे. त्याची तुलना हॉलीवूडशी करू नका तुम्ही वेगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांशीसमोर विषय मांडत आहे. हॉलिवूडमध्ये, लोक चित्रपटांमधून अभिनेत्यांची हेअरस्टाइल कॉपी करत नाहीत. तो वास्तविक जीवनात चित्रपटातील लाइन वापरत नाही.

चित्रपट पाहिल्यानंतर ते लोक खऱ्या आयुष्यात महिलांचा पाठलाग करायला सुरुवात करत नाहीत. पण हे सर्व आपल्या देशात घडते. हे आपल्या समाजाचे वास्तव आहे. तुम्ही आपल्या फिल्म इंडस्ट्रीची तुलना हॉलीवूडशी करू शकत नाही आणि म्हणू शकत नाही की 'हे काही लोक 'अ‍ॅनिमल'बद्दल असे का बोलत आहेत, जेव्हा ते 'गॉन गर्ल'चा एक कलाप्रकार म्हणून आनंद घेऊ शकतात?' तर अॅनिमलचा का नाही. तर हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हा महत्वाचा फरक आहे.

बॉलिवूडमध्ये असणं किंवा स्टार असणं तुम्हाला सॉफ्ट पॉवर देते. या सत्तेसोबत जबाबदाऱ्याही येतात. मी अशी कोणी नाही जो XYZ कलाकारांना सांगेल की त्यांनी हे चित्रपट करू नयेत. त्याची स्वतःची निवड आहे. आपण स्वतंत्र देशात आहोत आणि आपल्याला निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. पण मी अशाप्रकारच्या चित्रपटांचा भाग नक्कीच असणार नाही असे तापसीने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना देणार नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT