Sushmita Sen Dainik Gomantak
मनोरंजन

Viral Photo: एक्स बॉयफ्रेंडबरोबर फिरताना दिसली सुष्मिता, पॅचअपच्या चर्चांना पुन्हा उधान

Sushmita Sen: 2018 मध्ये जेव्हा रोहमनने सुष्मिताला इंस्टाग्रामवर मेसेज केला तेव्हा त्यांच्या नात्याची सुरुवात झाली.

दैनिक गोमन्तक

Sushmita Sen: बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच चर्चेत असतात. आता बॉलीवूडचे स्टार्स एकमेकांच्या घरी दिवाळी पार्टीला हजेरी लावताना दिसत आहेत. यानिमित्ताने बॉलीवूडची लाडकी अभिनेत्री सुष्मिता सेन चर्चांचा भाग झाली आहे.

नुकत्याच झालेल्या दिवाळी पार्टीत जेव्हा सुष्मिता सेनला एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलचा हात धरताना दिसली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर सुष्मिता आणि रोहमन शॉल पुन्हा एकत्र आले आहे का असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.

2021 मध्ये जेव्हा अभिनेत्रीने रोहमन शॉलसोबत ब्रेकअपची घोषणा केली तेव्हा चाहते नाराज झालेले दिसून आले होते. मात्र ब्रेकअप का केले यावर त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. पण ब्रेकअपनंतरही रोहमन शॉल सुष्मिताच्या आयुष्याचा एक भाग राहिला. तो अनेकदा सुष्मिता आणि तिच्या मुलींसोबत हँग आउट करताना दिसतो.

सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात याची कोणालाच कल्पना नव्हती. पण जेव्हा सुष्मिता रोहमन शालचा हात धरून दिवाळी पार्टीत पोहोचली तेव्हा चाहत्यांना आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. दोघांचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

Sushmita Sen-Rohman Shawl

व्हिडिओमध्ये साडी नेसलेली सुष्मिताने रोहमन शालचा हात पकडला आहे. दोघेही एकत्र खूप क्यूट दिसत आहेत. सुष्मिताला साडीत चालायला त्रास होत असल्याने रोहमन शॉल तिचा हात धरून बसलेला दिसला. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते कॉमेंट बॉक्समध्ये विचारत आहेत की दोघे आता एकत्र आहेत का?

रोहमन शॉलसोबत पहिली भेट आणि ब्रेकअप

डिसेंबर 2021 मध्ये सुष्मिता सेनने सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आणि रोहमन शॉल वेगळे झाल्याची घोषणा केली होती. तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ते ब्रेकअप झाले. 2018 मध्ये जेव्हा रोहमनने सुष्मिताला इंस्टाग्रामवर मेसेज केला तेव्हा त्यांच्या नात्याची सुरुवात झाली. त्यांच्या ब्रेकअपनंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

SCROLL FOR NEXT