Sushmita-Rohman Patch Up Dainik Gomantak
मनोरंजन

सुष्मिता सेन-रोहमनचे पॅचअप? सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून चर्चांना उधाण

ब्रेकअपनंतर दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसल्यामुळे त्यांच्या पॅचअपच्या अनेक चर्चा होऊ लागल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Sushmita-Rohman Patch Up: बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या नातेसंबंधांबाबत अनेकदा चर्चा होत असतात. त्यांचे ब्रेक अप झाल्यावर अनेकदा चाहते नाराज होत असतात. अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) नेहमीच नवनवीन गोष्टींमुळे चर्चेत असते. गेली काही वर्ष ती स्वत:पेक्षा वयाने लहान असलेल्या रोहमन शॉलला डेट करत होती. पण नंतर काही कारणामुळे दोघांनी आपले ब्रेकअप झाल्याची जाहीर घोषणा केली. मात्र ब्रेकअपनंतर दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसल्यामुळे त्यांच्या पॅचअपच्या अनेक चर्चा होऊ लागल्या आहेत. (Sushmita Rohman Patch Up latest news updates)

सुष्मिता सेन नुकतीच एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत दिसली होती. यावेळी ते दोघेही एकत्र कॅमेऱ्यात कैद केले. दोघेही कुठूनतरी येताना आणि एकमेकांसोबत गाडीत बसताना दिसले. इतकेच नाही तर, रोहमन सुष्मिता सेनला तिथे उपस्थित असलेल्या गर्दीपासून वाचवतानाही दिसला. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने यादरम्यानचा व्हिडीओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

ते दोघेही एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यावर तिथल्या जमावाने त्यांच्यासमोर गर्दी केली. यावेळी रोहमनने दोन्ही हातांनी सुष्मिताभोवती ठेवले. त्यामुळे परत त्यांचे पॅचअप झाले असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 16 September 2025: र्थिक ताण जाणवू शकतो, रोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी; मित्रांकडून मदत

Royal Enfield Bike: रॉयल एनफील्ड 'मीटिओर 350' नव्या अवतारात बाजारात दाखल, जाणून किंमत, फीचर्स आणि डिझाइनमधील मोठे बदल

Asia Cup 2025: टी-20 क्रिकेटमध्ये यूएईच्या मोहम्मद वसीमचा वर्ल्ड रेकॉर्ड! बटलरला मागे टाकत रचला नवा इतिहास VIDEO

Viral Video: लग्नासाठी घरचे तयार नाही झाले तर काय कराल? पठ्ठ्यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले...

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यावरुन गोव्यात रंगलं राजकारण; भाजप प्रदेशाध्यक्षांनी पवारांचं अज्ञानच काढलं

SCROLL FOR NEXT