Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
Chhatrapati Shivaji Maharaj JayantiDainik Gomantak

म्हापशात ‘स्वराज्य गोमंतक’ तर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यात्रा’

मिरवणुकीत ढोल पथके, अश्वदल, मर्दानी खेळ यांचा समावेश
Published on

म्हापसा: ‘स्वराज्य गोमंतक’तर्फे शिवजयंती निमित्त म्हापसा शहरात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली. ‘शिवजयंती यात्रा’ म्हणून परिचित असलेल्या या वार्षिक मिरवणुकीत ढोल पथके, अश्वदल, मर्दानी खेळ यांचा समावेश होता. टॅक्सीस्थानकावर मिरवणुकीचा समारोप करून रात्री उशिरा त्या ठिकाणी व्यासपीठीय कार्यक्रम झाला.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
हरमल येथील शेती खाऱ्या पाण्यामुळे नापीक

बोडगेश्वर मंदिराच्या प्रांगणात नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मिरवणुकीचा प्रारंभ झाला. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत वाळके, उदय मुंज, जयेश थळी व इतर कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. मिरवणुकीतील सादरीकरणाचे तीन प्रमुख कार्यक्रम बोडगेश्वर मंदिराचे प्रांगण, हुतात्मा चौक व टॅक्सीस्थानक अशा तीन ठिकाणी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com